दौंड:(पवन साळवे)कोरोना विषाणू ,संदर्भात प्रतिबंधात्मक उपयोजनेच्या अनुषंगाने पेट्रोल/डिझेल विक्री करणेस मनाई करणेबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यातील पेट्रोल डिझेल पंप असोसिएशन जिल्हा पुणे यांना पेट्रोल पंप बंद करण्याचे आदेश दिले आहे सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना या विषाणूचा संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत.तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून व देशांतर्गत विमान प्रावसाद्वारे प्रवाशी भारतात या विषाणू सर्वत्र प्रवास करीत आहेत.यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व विषाणूचे संसर्गात अधिक वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे.सदर संशयित रुग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती पुणे जिल्ह्यात उदभवू नये.यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा,दिनांक-१९८७ दि१३ मार्च 2020 पासून लागू खंड२,३,४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे.कोरोना विषाणूचा(कोव्हीड-१९)प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूचा संसर्गात. अधिक वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपयोजना म्हणून पेट्रोल/डिझेल पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या दुचाक्या/तीन चाकी/चार चाकी वाहनांमध्ये पेट्रोल भरणा करणेस मनाई करणेत येत आहे.तथापि १)अत्यावश्यक सेवेवर कार्यरत असणारे. सर्व अधिकारी/कर्मचारी. २)कोरोना नियंत्रण व निर्मूलनासाठी कार्य करणाऱ्या खाजगी व्यक्ती.३)अत्यावश्यक वस्तू व सेवा संदर्भात कार्य करणारी खाजगी व्यक्ती.४)वैद्यकीय उपचार किंवा सहाय्याची गरज असणारी व्यक्ती. वरीलप्रमाणे ०१ ते ०४ बाबींना यांना यातून सूट देणेत येत आहे. तथापि, सदर सूट देणेत येणाऱ्या व्यक्तीने एकदाच टाकी पूर्ण भरून घेणे बंधनकारक आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी/अन्नधान्य वितरण अधिकारी पुणे यांनी जिल्ह्यामधील वर नमूद ०१ ते ०४ इतर आवश्यक असणाऱ्या अधिकारी/कर्मचारी व खाजगी व्यक्ती यांचे वाहनांना पेट्रोल/डिझेल उपलब्ध करून देणेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व विभागाकडून यादी संकलित करून त्याची शहानिशा करून त्याप्रमाणे .पेट्रोल/डिझेल पंपधारकाना भरणा करणेसाठी उपलब्ध करून देणेत यावी(नवल किशोर राम) जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे.
Read Time3 Minute, 47 Second