ताडीवाला रोड येथील भिमाई प्रतिष्ठानच्या वतीने समाजातील दुर्लक्षित तृतीयपंथी समाजाला रेशन किट चे वाटप

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी सनी घावरी
पुणे-(ताडीवाला रोड पुणे) कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे महाराष्ट्रात सरकारद्वारे पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. अश्या परिस्थिती मुळे समाजातील विविध घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे या वेळी भिमाई प्रतिष्ठानच्या प्रयत्नातून समाजातील दुर्लक्षित तृतीयपंथी यांना रेशन कीट देण्यात आले सदरील कीट अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, समाजसेविका लक्ष्मीनारायण त्रिपाठी, उद्योजक मनिष जैन, पूजा जैन मॅडम तसेच प्रतिष्ठानचे मार्गदर्शक पोलीस प्रशासनातील विजय आंब्रे , यांच्याकडून मिळाले. सदर किट चे वाटप

मा. राहुल पवार (PSI) ताडीवाला रोड, पोलीस चौकी, पुणे, प्रकाश सावंत (महाराष्ट्र पोलीस) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भिमाई प्रतिष्ठानचे (संस्थापक) श्री सुनील रजपूत , (अध्यक्ष)अजय गायकवाड , गुलाब माविनकर,विरेष पवार, प्रफुल कांबळे, कुमार कांबळे, आकाश गायकवाड, प्रशांत आसवले, नितीन लोखंडे, राजू आढाव, धीरज जोशी हे उपस्थित होते.या वेळी भिमाई प्रतिष्ठानचे संस्थापक सुनील राजपूत हे या वेळी बोलले की शहरात अनेक ठिकाणी तृतीय पंथी आपल्याला सिग्नल किंवा अनेक दुकानात पैसे मागून
स्वतःच उदरनिर्वाह करताना पहावयास मिळते पण अश्या परिस्थितीत त्यांचे घरातून बाहेर पडणे हे कठीण आहे
आर्थिक स्तिथी बिकट असल्या कारणाने त्यांचे जगणे कठीण आहे अश्यात जर त्यांना कोरोनाची लागण झाली तर
त्यांना खाजगी रुग्णालयात मोफत उपचार सुरू झाले पाहिजे तसेच
भिमाई प्रतिष्ठानच्या प्रयत्नातून अनेक संस्थां व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आतापर्यंत 2000 किटचे वाटप करण्यात आले आहे. तसेच कोणत्या संस्थांना मदतीची आवश्यकता असेल तर पुढील क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन भिमाई प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आले आहे 9623988054 8888781985