अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-आज लॉकडाऊन मुळे गोर गरीब जनतेला एक वेळच्या जेवणाची चिंता पडलेली आहे,या काळात गोर गरीब जनतेला एक वेळच्या जेवणासाठी दरदर भटकण्याची वेळ आली आहे कुठून एक वेळेचे जेवण मिळते का हा प्रश्न नजरे समोर आहे
यात गोर गरिबांचे खूप हाल होत आहेत उपासमार होते आहे.
गोरगरिबांचे मुखय स्रोत असलेले वडापाव,भाजी पाव चे गाडे,हॉटेल पूर्ण पणे बंद आहेत . अशावेळी एक घास आपुलकीचा….. या संकल्पनेतून शिवसेना दौंड विधानसभा नेते अनिल (तात्या) सोनवणे, विधानसभा संघटक संतोष भाऊ जगताप यांच्या नेतृत्वा खाली शिवसेना दौंड विधान सभा च्या वतीने अन्न छत्र चालू करण्यात आले आहे.याला उदंड प्रतिसाद मिळत असून दौंडकरांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
अन्नछत्राचे अयोजक म्हणून अमोल जगताप,दादा बारटक्के,शैलेश पिल्ले,राकेश भोसले म्हणून कामकाज पाहत आहेत.शहर संघटक नामदेव राहिंज महिला आघाडीच्या दुर्गा सुरवसे, निखिल लंगोटे,गणेश साळुंके,महेश झोजे,धनंजय ताठे,आदी शिवसैनिकांचे सहकार्ये लाभत आहे.
