दौंड(प्रतिनिधी):- दि 1 मे दौंड शहरामध्ये करोना संशयित रुग्ण मिळून आल्याने दौंड शहर लिंगाळी गोपाळवाडी गिरिम चा काही भाग सोनवडी कंटेनमेंट झोन मध्ये आलेले आहे त्यामुळे औषधे सोडून सर्व अत्यावश्यक सेवा बंद करण्यात आलेले आहेत त्यामुळे कोणीही उद्या दुकाने उडवू नयेत किराणा दुकाने बंद राहतील जे ऑनलाईन सेवा देणारे आहेत त्यांनीच आपल्या बंद दुकानात पॅकिंग करून ऑनलाईन सेवा द्यावी सर्वांनी लोकांसाठी ऑनलाइन सेवा उपलब्ध करून द्यावी नगरपालिका मुख्याधिकारी याबाबत नियोजन करत आहे त्यांना सर्वांनी सहकार्य करावे प्रत्येक नगरसेवकाने आपापले वार्ड सांभाळावे आपल्या वार्डातील सर्व लोकांना ऑनलाइन भाजी किराणा मिळेल याबाबत दक्षता घ्यावी निवडणुकीला इच्छुक सर्व लोकांसाठी लोकसेवक होण्याची हीच वेळ आहे सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून जनतेला ऑनलाईन सेवा उपलब्ध करून द्यावी प्रत्येक वार्ड साठी कमिटी तयार करण्यात आलेली आहे त्यांनी अत्यावश्यक सेवा पुरवावी ज्यांना त्यात काम करण्याची इच्छा आहे त्यांनी नगरपालिका मुख्याधिकारी यांना भेटावे उद्या पासून कोणीही रस्त्यावर गाडीवर फिरणार नाही शहराच्या चहुबाजूने नाकाबंदी लावलेली आहे आजूबाजूच्या खेड्यांनी कुणीही विनाकारण दौंड मध्ये येऊ नये दौंड मध्ये प्रवेश दिला जाणार नाही किराणा भाजी यांनी आपल्या व्हाट्सअप नंबर लोकांना द्यावेत ते ऑनलाइन तुम्हाला आदेश देतील तेथे भाजी पाठवावी त्यामुळे परत एकदा आव्हान करत आहे की दौंड शहराच्या सभोवतालचा सर्व परिसर सील करण्यात आलेला आहे
लिंगाळी,गोपाळवाडी,गिरिम. त्यांनी आपल्या गावासाठी नियोजन करावे सर्वांना ऑनलाइन सेवा द्यावी
Read Time2 Minute, 38 Second