अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी हर्षल पाटोळे
दौंड-कोरोनच्या पार्श्वभूमीवर साउंड ,लाईट मंडप, जनरेटर व्यवसाय पूर्णपणे बंद झाला आहे. तो नव्याने चालू करण्यासाठी आज दिनांक 20 सप्टेंबर 2020 रोजी दौंड येथे मिटिंग आयोजित केली होती या मिटिंग मधे छावा क्रांतिवीर सेना , महाराष्ट्र राज्य प्रणित पुणे जिल्हा साऊंड सिस्टिम असोसिएशन यांच्यावतीने दौंड तालुका साऊंड लाईट, मंडप, जनरेटर असोसिएशन च्या अध्यक्षपदी मा. जितेंद्र देशमुख व उपाध्यक्षपदी मा. दादा मोरे याची निवड करण्यात आली या वेळी दौंड तालुका साऊड लाईट मंडप जनरेटरचे मालक वर्ग उपस्थिती होते त्या नंतर अध्यक्ष व उपाध्यक्षांनी सर्व सभासद यांच्यामध्ये अडी-अडचणी वर चर्चा झाल्या . त्या नंतर कुणावरही अन्याय होणार नाही याची आम्ही खात्री देतोय व आपण ही यापुढे आपल्याकडून कोणत्याही सरकारी नियमाचे उलनघन होणार नाही याची देखील काळजी घेणे गरजचे आहे. त्याचबरोबर गेली सहा महिने कोरोनाच् सावट असल्यामुळे आपल्या व्यवसायाला चालना मिळालेली नसून या पुढील काळात लोक डाऊन कमी होत आहे . तरी आपण शासनाला विनंती करून परिस्थिती नुसार शासकीय नियमात राहून आम्हाला देखील व्यवसाय चालू करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करू ज्याने करून आपल्या व्यवसाय करणाऱ्याना दिलासा भेटेल.