दौंड नगरपालिकेला कोणी वाली आहे का वाली…! अधिकारी मस्त,नागरिक त्रस्त…

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
महिला प्रतिनिधी योगिता रसाळ
दौंड(प्रतिनिधी)- नगरपालिकेचा तात्पुरता कारभार सासवडचे मुख्याधिकारी निलेश मोरे याच्यांकडे असून मगंळवार आणि गुरूवार या दोन दिवशी नगरपालिकेमध्ये येत असतात,पण ते आले तरी,त्यांच्यापुढे ठेकेदारांच्या गराडा असतो.यामुळे त्याना शहर विकासाबाबत महत्त्वाच्या कामाचा आढावा घेणे अवघड होते.पण या आठवड्यात ते आलेच नाहीत.
दौंड नगरपालिकेवर नियुक्त असलेले अनेक कर्मचारी हे रोज पुणेहून ये-जा करणारे आहेत.यातील अनेक कर्मचारी हे साडेतीन-चार वाजता पुण्याला निघुन जातात.यामुळे नागरिकांची कामे रखडली जातात.त्यांना दुसऱ्या दिवशीची वाट पाहत बसावे लागत आहे.याबाबतीत त्यांना विचारले असता,जिल्हाधिकारी व इतर कार्यालयात काम होते,असे उत्तर नेहमी दिले जाते.
दौंड नगरपालिकेवर पालिकेतील कर्मचारी मनमानी पद्धतीने कारभार करीत आहेत.कार्यालयीन कामाच्या वेळेत न येता कधीही येतात आणि कधीही निघुन जातात.यामुळेच कोणत्याही अधिकारी व कर्मचारी यांचा आपापसात ताळमेळ नसून,नगरपालिकेमध्ये अनागोंदी कारभार चालू आहे.
याचा दैनंदिन कामकाजावर गंभीर परिणाम झाला असून याला दौंडकर पुरते वैतागलेले आहेत. दौंड नगरपालिकेला पुर्णवेळ मुख्याधिकारी मिळावा अशी मागणी वारंवार नागरिकांकडून होत आहे.
यामुळे एकंदरीत नगरपालिकेला कोणी वाली नसल्याचे चित्र तयार झाले असून, नागरिकांमध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे.