दौंड(प्रतिनिधी):-29 मार्च रोजी मळद सोलापूर पुणे हायवेवर काही दरोडेखोरांनी ट्रकवर हल्ला करून मुद्देमाल लंपास करून फरार होते खुन व दरोडा प्रकरणी भा.द.वि.का.क.३९५,३९६,३९७,३९२,३४,३९४,३०७,३५३,नुसार गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून मुख्य चार आरोपी मधील या अगोदर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यातील आरोपी देवगान अजिनाथ चव्हाण या आरोपीवर पोलीस पाळत ठेऊन असताना दिनांक-९ मार्च २०२० रोजी सायंकाळी दौंडच्या डी.बी पोलिस पथकाने फिल्मी स्टाईलने पाच किलोमीटर पाठलाग करत असताना काटेरी झुडूप असल्याने पोलिस कर्मचाऱ्यांना जखमा झाल्या आहेत त्यांचेही किरकोळ उपचार सुरू आहेत अश्या एकनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांनी शिताफीने त्या आरोपीस जेरबंद केले.पो.निरक्षक.सुनिल महाडिक व सहाय्यक पो निरीक्षक- ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली.पी एस आय मोहिते,हेड कॉ.शेख असिफ नबिलाल, हेड कॉ. थोरात पांडुरंग एकनाथ,पो.कॉ.वाघ किशोर हनुमंत,पो.कॉ.शेख अमजद आदम,पो कॉ.वारे. पो.कॉ.गुंजाळ सूरज अशोक, व वार्डन आकाश शिंदे.कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता या आरोपीस जेरबंद केले व पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी हे करत आहेत.सर्व स्तरातून या कर्तव्यनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक होत.
दौंड प्रतिनिधी
कु:पवन गौतम साळवे