अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-दिनांक 31.8.2021 रोजी दौंड पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक श्री विनोद घुगे हजर असताना पोलीस निरीक्षक श्री विनोद घुगे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की मौजे देऊळगाव राजे गाव गावचे हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात तालुका दौंड जिल्हा पुणे येथे या ठिकाणी अवैधरित्या यांत्रिक बोटीच्या साह्याने विनापरवाना वाळू उपसा करून वाळू चोरी करीत आहे,अशी खात्रीशीर बातमी पोलीस निरीक्षक श्री विनोद घुगे यांना मिळाल्यानंतर सदर ठिकाणी कारवाई करण्याकामी दौंड पोलीस स्टेशन चा स्टाफ तसेच दौंड तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने मौजे देऊळगाव राजे गावच्या हद्दीत भीमा नदीच्या पात्रात तालुका दौंड जिल्हा पुणे येथे छापा घातला असता सदर ठिकाणी 60 लाख रुपये किमतीच्या वाळूउपसा करण्याकरिता वापरल्या जाणाऱ्या यांत्रिक फायबर बोटी मिळून आल्या त्या जागीच महसूल कर्मचारी यांच्या मदतीने फोडून पाण्यात बुडवून नष्ट करून टाकल्या असून सदर गुन्हा करणाऱ्या इसमान विरुद्ध महसूल कार्यालय कडील पदाधिकारी फिर्याद घेऊन कायदेशिर गुन्हा नोंद करत आहे.
सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक बारामती श्री मिलिंद मोहिते , उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड श्री राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री विनोद घुगे पोलीस अंमलदार पांडुरंग थोरात, विशाल जावळे, अमीर शेख, अमोल गवळी, अमोल देवकाते यांनी केली आहे.