दौंड मध्ये अढळली गांजाची शेती-स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीणची धडक कारवाई.

Read Time4 Minute, 45 Second

दौंड मध्ये अढळली गांजाची शेती-स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीणची धडक कारवाई. स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण पथकास दौंड परिसरात गांजा या गुंगीकारक वनस्पतींची शेती होत असलेबाबत माहिती गोपनीय बातमीदाराकडून मिळाली होती.सदरचा प्रकार हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मा.श्री.संदीप पाटील पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे श्री.पद्माकर घनवट,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थनिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण यांनी श्री.दत्तात्रय गुंड यांचे अधिपत्याखाली तपास पथकाची नेमणूक केली व त्यांनी योग्य त्या सूचना व आदेश केले.त्याप्रमाणे सदर पथकाने दौंड परिसरात माहिती घेत असताना गिरीम ता-दौंड, जिल्हा पुणे या ठिकाणी दत्तू शंकर शिंदे वय ४७ राहणार शिंदे वस्ती गिरीम ता-दौंड जिल्हा,पुणे.स्वतःच्या शेतीत गांजा या गुंगीकरक वनस्पतीचे झाडे लावून त्याची शेती करीत असल्याची गोपनीय बतमीदारकडून माहिती मिळाली.
सदर माहितीची खातरजमा करून माहिती खरी असल्याचे निष्पन्न झाले व पुढील कायदेशीर कारवाई करण्याकरिता, पोलीस निरीक्षक दौंड पोलीस स्टेशन यांना माहिती देण्यात आली व त्यांच्या सोबत संयुक्त पथकाने दौंड येथील गिरीम या गावात छापा टाकला असता त्याठिकाणी गांजाची शेती मिळून येताच कायदेशीर कारवाई करून गांजाची १४० किलो १०० ग्रॅम वजनाचा मुद्देमाल एकूण किंमत २१.०१.५०० चा मुद्देमाल पंचनाम्याने हस्तगत केला आहे.गांजाची शेती करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आले व दौंड पोलीस स्टेशनचे श्री:कल्याण किसन शिंगाडे पो हवा. यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक श्री:सुनील महाडिक करीत आहेत.
सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी श्रीमती:ऐश्वर्या शर्मा,(भा,पो,से) यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकाने केली.
१)पद्माकर घनवट(पो. नि.स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण)
२)सुनिल महाडिक (पो.नि.दौंड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण)
३)दत्तात्रय गुंड(सहा. पो.नि.स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण)
४)दत्तात्रय जगताप(सहा.पो.उपनिरीक्षक. स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण)
५)रविराज कोकरे.(पो.हवा.स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण)
६)अनिल काळे(पो.हवा.स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण)

७)सचिन गायकवाड(पो.हवा.स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण)
८)रऊफ इनामदार(पो.हवा.स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण)
९)गुरुनाथ गायकवाड(पो.ना.स्थनिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण)
१०)सुभाष राऊत(पो.ना.स्थनिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण)
११)चंद्रकांत जाधव(पो.ना.स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण)
१२)उमाकांत कुंजीर(पो.हवा.स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण)
१३)महेश गायकवाड(पो.हवा.स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण)
१४)निलेश कदम(पो.हवा.स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण)
१५)समाधान नाईकनवरे(पो.कॉ.स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण)

Happy
Happy
50 %
Sad
Sad
50 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post ग्रामपंचायत पाटस तर्फे नाभिक बांधवांना किराणा वाटप
Next post दौंड शहरातील बंगलासाईड येथील ठिकाणी पत्याच्या क्लबवर दौंड पोलिसांची धडक कारवाई.
error: Content is protected !!
%d bloggers like this: