ग्रामपंचायत पाटस तर्फे नाभिक बांधवांना किराणा वाटप
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड शहर प्रतिनिधी पवन साळवे
19मार्च 2020पासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पूर्ण भारतभर लॉकडाऊन सुरू आहे. दरम्यानच्या काळामध्ये अनेक नाभिक व्यावसायिकांचे व्यवसाय संपुर्णतः बंद होते. आपल्या पाटस गावातील सर्व नागरिकांनी अत्यंत काटेकोरपणे लॉकडाऊनचे पालन केलेले आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. आज ग्रामपंचायत पाटस तर्फे नाभिक समाजातील 43 कुटुंबांना अन्नधान्याच्या स्वरूपात किटचे वाटप करण्यात आले. खऱ्या अर्थाने नाभिक बांधवांनी पाळलेल्या लॉकडाऊन व सतर्कता यामुळे आज पर्यंत आपल्या गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही. नाभिक समाजाच्या सर्व व्यवसायिक बांधवांचे सरपंच संभाजी खडके कसबे पाटस व ग्रामपंचायत पाटस तर्फे खूप खूप धन्यवाद.