अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-: शहरात दिनांक १९ जून रोजी रात्री घडलेल्या अक्षय पाटील हत्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत छडा लावत मुख्य आरोपी भोला उर्फ निखिल अजबे याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी तात्काळ पथक तयार केले होते,पथक प्रमुख उपनिरीक्षक संदीप घुले, पोलीस हवालदार योगेश बेलदार, पोलीस अमलदार निलेश पाटील आणि दत्तू साळवे यांच्या या पथकाने वेगाने तपासाची सूत्रे हलवत संशयितांचा शोध घेतला.तांत्रिक माहिती व गोपनीय सूत्रांच्या आधारे आरोपींचा शोध घेत गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री अवघ्या १२ तासांच्या आत तिघांनाही ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.
या जलद कारवाईमुळे शहरात खळबळ उडालेल्या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला असून, आरोपींकडून अधिक चौकशी सुरू आहे. या प्रकरणामागील नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांच्या तत्पर आणि धाडसी कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत असून, गंभीर गुन्ह्यांचा जलद तपास करून आरोपींना अटक करण्यात चाळीसगाव पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.
