दौंड शहरात प्रथमच रंगला महिला क्रिकेटचा जंगी सामना….

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
महिला प्रतिनिधी योगिता रसाळ
दौंड(प्रतिनिधी)-दि-१२ सगळीकडे जागतिक महिला दिन साजरा होत असताना,दौंड शहरामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ दौंड आणि रोटक्लब दौंड कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने एस आर पी एफ बल गट क्रमांक 5 च्या ग्राउंड वर महिला क्रिकेटच्या सामन्यांचे जंगी आयोजन करण्यात आले.
या महिला क्रिकेट संघाच्या स्पर्धेचे उद्घाटन एस आर पी एफ बल क्रमांक 5 चे समादेशक आय पी एस वनिता शाहू यांनी केले.यावेळी डॉक्टर राजेश दाते-अध्यक्ष-रोटरी क्लब ऑफ दौंड हे उपस्थित होते.महिला क्रिकेट सामन्याच्या या स्पर्धेत महिलांचे एकूण बारा संघ सहभागी झाले होते,परंतु क्रिकेटच्या या जंगी सामन्यात प्रथम क्रमांक मिळवत 11 एंजल्स या संघटनेने विजेतेपद पटकावले.तर दुसरा क्रमांकावर टोजन संघाने बाजी मारली.तृतीय क्रमांक परिक्रमा वॉरियर्स या संघाने मिळवला.या स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम असुन,प्रथम क्रमांकासाठी-आठ हजार रुपये,द्वितीय क्रमांकासाठी-पाच हजार रुपये,आणि तृतीय क्रमांकासाठी-तीन हजार रुपये असे बक्षिसांचे स्वरूप होते.