अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
तालुका प्रतिनिधी योगिता रसाळ
दौंड(प्रतिनिधी) दि.१ मे २०२३,दौंड नगरीचे श्रद्धास्थान ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ आणि माता जोगेश्वरी मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले झाले असून आज पासून३ दिवस मंदिराच्या कलशरोहण समारंभ सोहळ्याचे आयोजित करण्यात आले आहे.आज सोमवार दि १ मे रोजी सायंकाळी सहा वाजता कलश ग्रामदक्षिणा मिरवणूक काढण्यात येणार असून,मंगळवार दि.२ मे रोजी सकाळी आठ वाजता मुख्य देवता पूजन आणि होमहवन कार्यक्रम असून,बुधवार दि.३ मे रोजी सकाळी आठ वाजता श्री कालभैरवनाथ मुख्य देवता पूजन, महाअभिषेक होमहवन करून त्याच दिवशी दुपारी ३ वाजता कलश समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व सोहळ्याचे पौरोहित्य, वेदमूर्ती-निरज फडके,केदार पाटणकर,दुवेॅश धैसास,संकेत डोके,अतुल गटणे आणि समस्त गटणे परिवार यांच्या कडून केले जाणार आहे.
संध्याकाळी ६ वाजता पाटील चौक येथे महाप्रसाद आहे, तरी या कलशारोहण कार्यक्रमास पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य,दौंड नगरीचे पाटील-वीरधवल जगदाळे,श्री भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटी आणि समस्त दौंडकर यांनी केले आहे.