अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरात खड्डेच खड्डे मात्र नगरसेवकांचे सुद्धा ऐकत नसल्याचे सांगत निष्क्रिय नगरपालिका प्रशासन असे आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ढोलबजाव आंदोलन करण्यात आले.
आज सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय ते नगरपालिका पर्यंत चाळीसगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ढोलबाजाव आंदोलन करण्यात आले यावेळी नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत नगरपालिका प्रशासन निष्क्रिय असल्याचे आरोप करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी,नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
शहराची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून शहरात खड्डेच खड्डे झाले आहे नागरिकांना वाहन चालविणे म्हणजे तारेवरची कसरत अशी परिस्थिती झाली आहे या खड्ड्यांबद्दल नगरपालिका प्रशासनास वारंवार तक्रार करून देखील दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगत शहराची अवस्था जनता आपल्या डोळ्यांनी बघत असून शहराची खड्ड्यांमुळे चाळणी झाली आहे या कडे लक्ष वेधण्यासाठी तसेच झोपलेल्या नगरपालिका प्रशासनास जागे करण्यासाठी ढोल बजाव आंदोलन करण्यात आले असून येत्या पंधरा दिवसात जर खड्डे बुजविण्यात आले नाही तर अर्धनग्न आंदोलन करणार असल्याचे पदाधिकारींनी सांगितले
हे आंदोलन माजी आमदार राजीव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किसनराव जोर्वेकर, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, शशिकांत साळुखे,शहराध्यक्ष शाम देशमुख, नगरसेवक भगवान पाटील,भाऊसाहेब पाटील, अॅड. प्रदिप अहिरराव,नगरसेवक रामचंद्र जाधव, नगरसेवक प्रदिप राजपूत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा अध्यक्ष मोहित भोसले, नगरसेवक दिपक पाटील,विरेंद्रसिंग राजपूत, भाणाली चौधरी,सरदारसिंग राजपूत, योगेश पाटील, दीपक सूर्यवंशी, राजू शैहनवाज, भुषण ब्राह्मणकार, शेखर देशमुख, अजय पाटील, ईश्वर ठाकरे,भाऊसाहेब केदार, संजय जाधव, प्रशांत पाटील, भैय्यासाहेब पाटील, कुणाल पाटील,सुरेश गायकवाड, भुषण पाटील, निखिल देशमुख, धनंजय देशमुख, छोटू पाटील, राकेश राखुंडे, सदाशिव गवळी, शेखर सोनवणे, सुरेश चौधरी,जगदीश चव्हाण, सुजित पाटील, शुभम पवार,मंगेश, सुरज शर्मा, गुंजन मोरे, सिद्धार्थ देशमुख,प्रकाश पाटील, उमेश राजेंद्र व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.