नववर्ष व चेट्रीचंड भगवान झुलेलाल जयंती सिंधी समाजबांधवांतर्फे उत्साहात साजरी.

संपादक गफ्फार शेख
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी) -शहरात सिंधी नववर्ष व चेट्रीचंड भगवान झुलेलाल जयंती दि 23 रोजी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
यनिमित्त सायंकाळी 5 वाजता नवजवान सिंधी सेवा मंडळ येथे भगवान झुलेलाल यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते पूजन करून ढोल ताशा व डी जे च्या गजरात मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणूक रेल्वेस्टेशन मार्गे सिंधी कॉलनी, हनुमान वाडी, जावून नवजवान सिंधी सेवा मंडळ येथे सांगता करण्यात आली.यावेळी सिंधी समाज बांधव भगिनी मोठया संख्येने सहभागी झाले होते.मिरवणुकीत देवी देवतांचे देखावे सादर करण्यात आले होते तर रस्त्यावर थंड सरबत प्रसाद वाटप करण्यात आले.
यनिमित्त पहिल्यांदा सर्व सिंधी समाज बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवली होती
सायंकाळी महाप्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी उद्योजक तथा माजी नगराध्यक्ष भोजराज पुंशी, शेखर बजाज, प्रितमदास रवलानी, अशोक रावलानी, सुभाष बजाज, हंसराज रवलानी, शंकर लुंड, सुरेश मंधानी, अमर बजाज, चंदर ओचानी, दिलीप तलरेजा, चंदर गोपलानी, नानकराम ओचानी, कन्हैयालाल मिलानी, लोकेश गोपलानी, विशाल कारडा, राज पुंशी, रिकी सोनार, लकी तलरेजा, दिलीप माखीजानी, जितू वाधवानी, राजेश धिंगरिया, राम डेबांनी, जय गोविंदानी, जयेश कारडा, ध्रुव वासवानी, पप्पू चावला, शिरू कोडवानी, अंकुर शर्मा, बाबुलाल शर्मा आदी सिंधी समाज बांधव, भगिनी उपस्थित होते.