पाचोरा – भडगांव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डीपी साठी कॉग्रेस चे ठीय्या आंदोलन :विद्युत मंडळाने घेतली दखल

Read Time3 Minute, 19 Second

पाचोरा (प्रतिनिधि) -पाचोरा – भडगांव तालुक्यातील काही गावांचे ट्रान्स्फर जळाल्याने महीनाभरा पासून शेतकरी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात चकरा मारुन उपयोग झाला नाही त्यामुळे अखेर शेतकर्‍यांसाठी कॉग्रेस चेसचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली ठीय्या करताच जळालेल्या डीप्या तात्काळ मिळाल्याने आंदोलनाचे मागे घेण्यात आले यावेळी शेतकर्यांनी आंनद व्यक्त केला.पाचोरा,भडगांव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातात आलेला शेतीचा माल जाण्याची वेळ केवळ विद्युत महावितरण कंपनी च्या हलगर्जीपणा मुळे होती तब्बल महीनाभरा पासून ट्रान्स्फर जळाले होते दैनंदिन शेतकरी येथील गिरड रस्त्यावर असलेल्या ट्रान्स्फारमर कार्यालयात येत होते मात्र अधिकारी वर्गाच्या उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने शेतकरी त्रस्त झाले होते. यात पाचोरा तालुक्यातील पिंप्री सह नेरी आणि भडगांव तालुक्यातील शिवणी येथील शेतकर्यांचा समावेश होता. हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी आपली कैफियत कॉग्रेस चे राहुल गांधी युथ ब्रिगेड महाराष्ट्र अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या कडे करताच त्यांनी तात्काळ विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्यांना बरोबर घेऊन ठीय्या आंदोलन केले असता संबंधित अधिकारी कनिष्ठ अभियंता आर. डी ठाकरे यांनी तात्काळ मागणी ची दखल घेतली यात पिंप्री गावातील शेतकऱ्यांचा १०० एचपी चा ट्रान्स्फारमर बसवण्यात आला तर नेरी आणि शिवणी चा ६३ एचपी ट्रान्स्फारमर बसविण्यात येणार आहे. यावेळी सचिन सोमवंशी यांच्या सोबत नेरी येथील लहु पाटील, विजय सुर्यवंशी, सोमा अहीरे, साहेबराव बोरसे, दिलीप पाटील, काशिनाथ अहीरे, बंटी भोई तर पिंप्री येथील वामन पाटील, दत्तु पाटील, कडुबा पाटील, भास्कर कोठावदे, कैलास पाटील, मिथुन पाटील, चुडामन पाटील, मधुकर पाटील, संतोष पाटील,शिवणी चे रविंद्र अहीरे, लक्ष्मण माळी, राजेंद्र जाधव, पप्पू सोनवणे, जिभाउ माळी, राकेश माळी, एकनाथ गांगुर्डे आदी शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने अभियंता श्री ठाकरे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post शिवाई मातेचे मंदिर दौंड शहरात असावं असा संकल्प शिवाई देवी नवरात्र उत्सव मंडळाने केला होता,सदर मंदिर उभारणी च्या शुभ कामा ची सुरवात आमदार राहुल दादा कुल यांच्या हस्ते झाली.
Next post कोरोना विषाणूबाबत भिती नको तर काळजी घ्या अपर जिल्हाधिकारी डॉ नंदकुमार बेडसे
error: Content is protected !!
%d bloggers like this: