चाळीसगांव(प्रतिनिधी):-दिनांक १४/४/२०२० पीपल्स सोशल फाउंडेशन व रोटरॅक्ट क्लब चाळीसगाव क्लासिक. यांच्या वतीने दरवर्षी १० एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज,महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त समाज प्रबोधनपर ऑर्केस्टा,व्याख्यान विविध क्षेत्रातील समाजसेवकांचा सत्कार करण्यात येतो.मात्र आज संपूर्ण जगामध्ये कोरोना ने थैमान घातले आहे.आज संपूर्ण देश लोकडाऊन आहे.शासन व राज्यशासन यांच्या परीने प्रयत्न करताना आपण पाहत आहोत. मात्र काही कुटुंबांना कोरोना सोबत भूक मारीचा देखील सामना करावा लागतो आहे.व सध्याची स्थिती लक्षात घेता फाउंडेशनच्या पदाधिकारी यांनी निर्णय घेतला की,संयुक्त जयंती साजरी न करता शहरातील विधवा महिला, रेशन कार्ड नसलेले व हातमजुर अशा १०० कुटुंबांना किराणा वाटप करण्यात आला.
व गेल्या काही दिवसांपासून फाउंडेशन व रोटरॅक्ट चे सदस्य सातत्याने मदत कार्य करीत आहे. सदर कार्याला मदत करण्यासाठी काही दात्यांनी हात पुढे केले आहे. पीपल्स सोशल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने तसेच नगरसेवक भगवानआबा पाटील,डॉ.संदीप देशमुख अध्यक्ष रोटरी क्लब चाळीसगाव,अनिताताई शर्मा समाजसेविका
प्रा. नितीन ननावरे सर, प्रा.रवींद्र बोरसे सर,प्रा.गौतम सदावर्ते सर,प्रा अभिषेक धांडे सर,सोनलताई साळुंखे तालुका अध्यक्ष – महिला राष्ट्रवादी,योगेश राजधर पाटील मुख्याध्यापिका शारदा महाले मॅडम
,पीपल्स सोशल फाउंडेशन व रोटरॅक्ट क्लब ऑफ चाळीसगाव क्लासिक चे अध्यक्ष आकाश पोळ,रोटरॅक्ट सचिव हर्षल माळी फाउंडेशन चे दीपक मोरे. सहसचिव अरविंद खेडकर, महेंद्र कुमावत,कुणाल पवार,श्रीकांत आव्हाड यांनी आयोजन केले होते.समाजातील काही घटकांना आपल्या मदतीची गरज व सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील लोकांनी आज पुढे येऊन मदत करण्याची गरज आहे. आतापर्यंत ज्या लोकांनी मदत केली आहे त्यांचे आभार व तसेच सर्वांनी घरी राहून प्रशासनास मदत करण्याचे आव्हान आकाश पोळ व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Read Time3 Minute, 15 Second