अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
कोपर्डी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथे चार वर्षापूर्वी एका अल्पवयीन मुलीचा गावातील काही विकृत नराधमांनी बलात्कार करून निर्घृण खून केला होता. या नराधमांना न्यायदेवतेने फाशीची शिक्षा दिली असून अद्याप पर्यंत शिक्षेची अमंलबजावणी झालेली नाही. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे महाराष्ट्रातील व महाराष्ट्र बाहेरील मराठा समाज पेटून उठला या प्रमुख विषयासाठीच महाराष्ट्रात व महाराष्ट्रा बाहेरिल ५२ पेक्षा जास्त लाखोंचे मोर्चे निघाले होते.
या विषया संदर्भात सर्व मराठा समाजाच्या भावना अत्यंत तीव्र आहेत समाजाच्या भावना लक्षात घेऊन या गुन्हेगाराना लवकरात लवकर फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने योग्य ते प्रयत्न करावेे.त्या करिता दौंड पोलीस स्टेशन व तहसीलदार यांना मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र व अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड शहर व तालुका यांच्या संयुक्तविद्यमानाने निवेदन देण्यात आले ते निवेदन देण्यासाठी हरिभाऊ ठोंबरे,नंदू नाना जगताप, विक्रम बाबा पवार,आशिष शिंदे, अविनाश गाठेे, रवींद्र देसाई, रोहन घोरपडे व दोन्ही संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.