अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंडकर कोरोनाने त्रस्त दौंड मध्ये आणखी आठ रूग्ण पॉजीटीव्ह त्यात सात पुरूषांचा तर एका महीलेचा समावेश आहे.
दिं.13/07/2020 रोजी 42 रूग्णांचे घशातील स्त्राव तपासणी साठी पुणे येथे पाठवले होते. त्या पैकी 41रूग्णांचे रीपोर्ट आज दिं 14/07/2020 रोजी आले आहे त्यात दौड शहरातील एकुण आठ रूग्ण पॉजीटीव्ह आढळूण आले आहेत. गांधी चौक एक,शिवाजी चौक एक,विठ्ठल मंदिर एक,वडारगल्ली एक,भैरवनाथ मंदिर एक,शालीमार चौक एक,ईरीगेशन काँलनी एक,पंचशिल थीएटर एक, असे शहरात एकुण आठ रूग्ण आढळले आहे.ते रुग्ण 25 ते67वयोगटातील आहेत.अशी माहीती दौंड उपजिल्हा रूग्णालय वैद्यकीय अधिक्षक डाँ. संग्राम डांगे यांनी दिली.
