Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

महिला शिक्षकांशी अश्लील पणे वागणाऱ्या शिक्षकावर (पर्यवेक्षक) कारवाई करण्याची रयत सेनेची मागणी

0
0 0
Read Time3 Minute, 58 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक(शेख)

चाळीसगाव प्रतिनिधी – चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेच्या शाळेतील एक शिक्षक हा सहकारी शिक्षिका यांना अश्लील संभाषण करून, अश्लील हातवारे करून गेल्या काही दिवसांपासून त्रास देत असल्याने त्याचेवर कारवाई करावी अन्यथा रयत सेनेच्या
वतीने १५ दिवसात चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी च्या आ. ब. हायस्कूल परीसरात आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे संस्थेचे चेअरमन, सचिव यांना दि २९ रोजी दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की या शिक्षकामुळे अनेक महिला शिक्षिका त्रस्त आहेत शिवाय त्या मानसीक त्रासामध्ये आहेत असे निवेदन नुकतेच राजपूत करणी सेनेने दिले असून ते सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले आहे.यावरून सदर शिक्षकाने केलेले हे कृत्य अशोभनीय असून शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारे आहे.
शाळा ही शिक्षण देऊन नवीन पिढी घडवणारी असते याठिकाणी विद्यार्थ्यांना संस्कार देऊन घडवले जाते आणि जे विद्यार्थ्यांना शिकवले जाते तेच विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबुन जाते सध्या पूर्ण शाळेत हीच चर्चा सुरू असल्याने त्यांच्या बालमनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याचा विचार करून याबाबत संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे
या संपूर्ण प्रकरणाची संस्थेच्या शिष्टमंडळाने चौकशी करावी,
ज्या महिला शिक्षकांना याचा त्रास झाला असेल त्यांचे गोपनीय जवाब नोंदवून त्यात संबंधित दोषी शिक्षकावर बडतर्फ ची कारवाई करून हे प्रकरण पोलीस स्टेशन ला द्यावे व गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
लवकरात लवकर याबाबत निर्णय न घेतल्यास रयत सेनेच्या वतीने १५ दिवसात चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी च्या आ. ब. हायस्कूल परीसरात आंदोलन छेडण्याचा इशारा चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी चेअरमन नारायण अग्रवाल यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रत गटशिक्षणाधिकारी चाळीसगाव , चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव, मुख्याध्यापिका आ. ब. हायस्कूल, शहर पोलीस स्टेशन चाळीसगाव यांना देण्यात आले आहे
.निवेदनावर रयत सेना जिल्हाध्यक्ष संजय कापसे, विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, तालुका उपाध्यक्ष भरत नवले, शहर उपाध्यक्ष छोटू अहिरे, प्रदीप मराठे, दीपक देशमुख, ज्ञानेश्वर सोनार, भूषण पाटील, रमेश पाटील सोमनाथ माने ,अनिल पाटील, मेरा गाव मेरा तीर्थ चे खुशाल पाटील आदींच्या सह्या आहेत

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: