अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक(शेख)
चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि 30 नोव्हेंबर रोजी माजी आमदार राजीव देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बापूसो भगवान पाटील मित्र मंडळातर्फे मोफत पोलीस भरती चे अर्ज भरण्यात आले.
दूरदृष्टी असलेले माजी आमदार राजीव देशमुख यांच्या कार्यकाळात शहरवासीयांना असलेली सर्वात मोठी समस्या ती म्हणजे पिण्याच्या पाण्याची होती ती मार्गी लावत तालुक्यासाठी जलदुत बनलेले माजी आमदार राजीव देशमुख यांचा वाढदिवस नुकत्याच जाहीर झालेल्या मेगा पोलिस भरतीसाठी बापुसो. भगवान पाटील मित्र मंडळामार्फत गरजू तरुणांसाठी आयोजित पूर्णपणे मोफत अर्ज आणि चलन भरणे कार्यक्रम करत साजरा करण्यात आला,कार्यक्रमास परिसरातील गरीब,होतकरू तसेच गरजू तरुणांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आणि 110 पेक्षा जास्त फॉर्म यशस्वीरीत्या भरले गेले.
सदर कार्यक्रमास माजी आमदार राजीव देशमुख,भगवान पाटील,श्याम देशमुख,रामचंद्र जाधव,मिलिंद शेलार यांनी कार्यक्रम स्थळी भेट दिली व भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी प्रोत्साहीत केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभाग क्र.2 मित्र मंडळ,बापुसो.भगवान पाटील मित्र मंडळाने परिश्रम घेतले.