मासिक पाळी आजही अंधश्रद्धेने ग्रासलेली दिसते-डॉ. निलांबरी तेंडुलकर

1 0
Read Time5 Minute, 21 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह

चाळीसगाव(प्रतिनिधी)-९ ऑगस्ट क्रांती दिन तसेच विश्व मूलनिवासी दिना निमित्त व्याख्यान संपन्न.. चाळीसगाव येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चाळीसगाव पश्चिम शाखेच्या वतीने क्रांती दिन व विश्व मूलनिवासी दिना निमित्ताने दि.९ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी तीन वाजता महात्मा फुले लाईफ ॲण्ड मिशन सेंटर, फुले नगर येथे’मासिक पाळी आणि अंधश्रद्धा’या विषयावर प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निलांबरी तेंडुलकर यांचे व्याख्यान संपन्न झाले.
कार्यक्रमाचे उद्घाटन ‘भारतीय संविधानाचे’ पूजन आणि संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करून करण्यात आले . त्याचबरोबर विचारपिठा वरील प्रमुख पाहुण्यांना पुष्प गुच्छ न देता संविधानाच्या प्रास्ताविकाची प्रत भेट म्हणून देण्यात आली.

यावेळी डॉ. निलांबरी तेंडुलकर यांनी पाळीचे चक्र समजावून सांगितले आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.गर्भाशयाचे ईंंन्फेक्शन, योनीमार्गातील जंतूसंसर्ग, गर्भाशयाचा कॅन्सर या आजारांविषयी सखोल माहिती दिली आणि काय काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले .एखाद्या स्त्रीला मूल होत नसेल तर त्या मागे अनेक कारणे असू शकतात हे सांगीतले. पण बर्याचदा स्त्रीला च दोषी ठरवले जाते आणि ते किती चूकीचे असते हे स्पष्ट केले . महिलांच्या शरीरात रक्ताची पर्यायाने हिमोग्लोबिन कमी असते, पाळी दरम्यान अंगावरून जास्त रक्तस्त्राव किंवा कमी रक्तस्त्राव होतो त्यामुळे गरोदरपणात तीला अनेक समस्या निर्माण होतात.म्हणून तिच्या आहाराकडे सुरुवातीपासून लक्ष देणे किती आवश्यक आहे हे स्पष्ट केले.बर्याचदा घरात एखादा कार्यक्रम असेल तर महिला पाळी पुढे ढकलण्याचा गोळ्या घेताना दिसतात, अशा प्रकारे पाळीच्या नैसर्गिक चक्राशी वारंवार छेडल्याने त्याचे दुष्परिणामही महिलेलाच भोगावे लागतात.त्यातून कंबरदुखी, पोटदुखी, डोकेदुखीला सामोरे जावे लागते.मूलीला पाळी येणं हि संपूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे, मासिक पाळी आल्याशिवाय महिलेला मातृत्व प्राप्त होत नाही.ईतकी महत्वाची असणारी ही मासिक पाळी आजही अंधश्रद्धेने ग्रासलेली दिसते, मासिक पाळी म्हणजे काहितरी घाण अशी भावना खेड्यापासून शहरापर्यंत सहज आढळून येतं . मासिक पाळी सुरू होण म्हणजे दर महिन्यात महिलांच्या गर्भाशयात पेशी आणि रक्तवाहिन्यांच एक अस्तर तयार होत असतं आपण सर्वजण जन्माला आलो आहोत ते या अस्तराच्या अस्तित्वामुळेच आणि त्यालाच आपण अशुद्ध, अपवित्र आणि विटाळ मानतो, नैसर्गिक क्रियेचा केवढा बाऊ करतो.ज्या क्रियेमुळे स्त्रीला मातृत्व लाभलं मगं या क्रियेला अशुद्ध आणि पाप मानणं योग्य नाही आपण आज खर्या अर्थाने स्त्री पुरुष समानता मानतो तर या चूकीच्या समजूतीतून बाहेर येणं गरजेचं आहे.‌.शेवटी प्रश्नोत्तराच्या सदरात मुलींच्या तसेच महिलांच्या अनेक शंकांचे निरसन केले.‌.‌ या प्रसंगी विचार पिठावर महाराष्ट्र अंनिस चाळीसगाव पश्चिम शाखेच्या अध्यक्षा मा प्रतिभा ताई पाटील आणि प्रा विजया चव्हाण उपस्थित होत्या . पाहुण्यांचा परिचय प्रियंका कांबळे यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा विजया चव्हाण यांनी केले, सूत्रसंचलन वैशाली निकम आणि आभार प्रदर्शन रिमा पाईकराव यांनी केले,या कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य मुली आणि महिला उपस्थित होत्या.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
100 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.