मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निलंबित करण्यात यावे-गौतम कांबळे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-राज्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी आंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापना अद्याप दिलेली नाही . अशा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मेलद्वारे पाठवलेल्या निवेदनात केली आहे .याविषयी आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की ,
शासनाच्या आंतरजिल्हा बदलीबाबतच्या सकारात्मक धोरणामुळे २२ऑगस्ट २०२२ रोजी राज्यातील ३९४३ शिक्षक आपल्या जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीने गेले आहेत . त्यातील बहुतांश शिक्षकांना ५ सप्टेंबर २०२२ पर्यंत कार्यमुक्त केले आहे . परंतु अनेक शिक्षकांना बदलीने गेलेल्या जिल्हा परिषदांनी पदस्थापना दिलेल्या नाहीत .त्यामुळे या शिक्षकांना पगार मिळण्यास विलंब झालेला आहे , ही बाब गंभीर आहे .अनेक शिक्षक आर्थिक बाबीपासून तसेच आपल्या कुटुंबाला आरोग्य सुविधा व सणासुदीच्या गरजा भागविण्यापासून वंचित राहत आहेत .दिवाळी सण जवळ आलेला आहे .परंतु आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना अद्याप त्यांचा पगार देण्यात आलेला नाही .ही बाब गंभीर असून शिक्षकांवर अन्याय करणारी आहे .याची गंभीर नोंद घ्यावी व पदस्थापना देण्यास दिरांगाई करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्यावर निलंबनासारखी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मेल द्वारे पाठवलेल्या निवेदनात केली आहे . तसेच या शिक्षकांना मुख्यालयात ठेवल्यामुळे शिक्षकांच्या पगारावर होणारा खर्च या अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करण्यात यावा अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे . या निवेदनाच्या प्रती एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य , देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व राहुलदादा कुल आमदार दौंड विधानसभा यांना देण्यात आलेल्या आहेत .यावेळी राज्य महासचिव विठ्ठल सावंत , राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळिंबे , राज्य उपाध्यक्ष संतोष ससाने , दौंड तालुकाध्यक्ष दुर्योधन चव्हाण व महासचिव विजय रणशृंगारे इंदापूर तालुकाध्यक्ष सुहास मोरे व महासचिव शशिकांत मखरे , मुळशीचे तालुकाध्यक्ष दशरथ गावडे , हवेलीचे तालुकाध्यक्ष राहुल गायकवाड ,बारामतीचे तालुकाध्यक्ष विनोदकुमार भिसे व महासचिव सतीश शिंदे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .