ग्रामीण रुग्णालयात रिक्त पदे भरत योग्य त्या सुविधा रुग्णांसाठी सुरू कराव्या मराठा महासंघाची निवेदन द्वारे मागणी

संपादक गफ्फार मलिक(शेख)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना तातडीच्या सुविधा मिळाव्या तसेच रिक्त पदे त्वरित भरावे अखिल भारतीय मराठा महसंघातर्फे दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या निवेदनात म्हटले आहे की, चाळीसगाव तालुका हा चार जिल्ह्याच्या सीमेवरील असून तालुक्याची लोकसंख्या देखील चार लाखाच्या आसपास आहे. तालुक्यातील नागरिकांना/रुग्णांना शासनाच्या वैद्यकीय विनामूल्य सुविधा मिळाव्यात. या हेतूने शासनाने करोडो रुपये खर्च करून चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज अशी इमारत बांधली आहे. त्यात तातडीच्या अनेक सुविधांचा वनवा दिसून येत आहे. त्यामुळे या सुविधा पासून रुग्णांना वंचित राहावे लागत आहे. म्हणून मोठा रोष निर्माण होत आहे. चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात अस्थिरोग तज्ञ, नियमित तीन वैद्यकीय अधिकारी, चार नर्स स्टॉप, एक्स-रे तंत्रज्ञ, दोन स्वच्छता कर्मचारी इत्यादी पदे रिक्त असल्याने रुग्णांना तातडीची सुविधा मिळत नाही. म्हणून चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना तातडीच्या योग्य त्या सुविधा मिळाव्यात व वरील रिक्त पदे भरण्यात यावे. अशी मागणी मराठा महासंघाच्या वतीने खासदार उन्मेश पाटील, आमदार मंगेश चव्हाण, ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी मंदार करंबळेकर सर यांना केली आहे. सदरच्या निवेदनावर चाळीसगाव शहराध्यक्ष खुशाल बिडे, शहर उपाध्यक्ष जगदीश वाघ, शहर सचिव रामचंद्र सूर्यवंशी, सहसचिव दत्तात्रय जगताप, एडवोकेट दीपक वाघ, युवक तालुकाध्यक्ष परमेश्वर पाटील, तालुका युवक उपाध्यक्ष संदीप पाटील व आदी मराठा बांधवांच्या सह्या आहेत.