चाळीसगाव(प्रतिनिधी):-दि 13 मार्च 2020 रोजी आनंदीबाई बंकट मुलींचे हायस्कूल येथे रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव तर्फे “चला लढूया कोरोनाशी…” या विषयाला अनुसरून विषाणूजन्य आजार टाळण्यासाठी करावयाचे उपाययोजना व घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन पर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, ज्यात रोटरी च्या WINS(wash in schools) उपक्रमाअंतर्गत विषाणूजन्य आजार टाळण्यासाठी हात स्वच्छ धुण्याच्या पध्दती चे प्रशिक्षण रोटे कासार सर , भास्कर पाटील व संग्राम सिंग शिंदे यांनी दिले, तसेच त्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थीनिंकडून करवून घेतले, यावेळी अध्यक्षीय मनोगतात Dr संदीप देशमुख यांनी कोरोना चा होणार प्रादुर्भाव, त्याची लक्षणे, त्यावर करण्यात येणारे उपाय, व त्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले, त्यावेळी व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शाह मॅडम, सौ. संपदा ताई पाटील, रोटरी क्लब चे सदस्य उपस्थित होते, यावेळी जवळ जवळ 700 हुन अधिक विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सरतेशेवटी सचिव रोटे रोशन ताथेड यांनी सर्वांचे आभार मानले ज्यात त्यांनी सांगितले की, आम्ही फक्त 700 विद्यार्थिनींना नव्हे तर 700 कुटुंबातील सदस्यापर्यंत यामाध्यमातून जन जागृती पोहचवीत आहोत, तसेच रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव चाळीसगाव मधील जास्तीत जास्त शाळांमध्ये असे उपक्रम घेऊन लोकांमधील भीतीचे सावट दूर करण्याचा प्रयत्न करेल असा विश्वास रोटे मधुकर कासार यांनी व्यक्त केला. यावेळी रोटे बलदेव पुंशी, राजेंद्र कटारिया, सुभाष जाधव व शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
Read Time2 Minute, 42 Second