रोटरी क्लब ऑफ दौंड यांच्या वतीने शांतता पुरस्काराचे वितरण,उत्कृष्ठ तंटे मिटवणे स्पर्धेत गोपाळवाडीचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल होले यांचा प्रथम क्रमांक

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-रोटरी क्लब दौंड यांच्या वतीने दौंड तालुक्यातील पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष यांनी त्यांच्या गावात शांतता, सुव्यवस्था व सलोखा निर्माण करून गावाचे गावपण टिकवले आहे याविषयी ची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती,त्याचे काल दौंड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले,या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ राजेश दाते,दौंड प्रथम न्यायदंडाधिकारी श्रीमती गोयल मॅडम,एसआरपी ग्रुप सातचे समादेशक आयपीएस अधिकारी वसंतराव परदेशी, एसआरपी ग्रुप सातच्या समादेशक आयपीएस श्रीमती विनीता साहू,दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील,सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड,पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी,रोटरी क्लबचे सचिव अमीर शेख तसेच रोटरी क्लबचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते,स्पर्धेचे स्वरूप
” गावपातळीवर उत्कृष्ठ तंटा मिटविणे स्पर्धांमध्ये”
तंटामुक्ती अध्यक्ष व पोलीस पाटील पुरूषासाठी तीन क्रमांक काढले गेले तसेच महिलांसाठी तीन क्रमांक काढण्यात आले, तसेच जे पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते त्यांचा ही प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. न्यायाधीश व आयपीएस अधिकारी” यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा संपन्न झाला.या मध्ये दौंड पोलिस स्टेशन तसेच यवत पोलिस स्टेशन मधील अध्यक्ष व पोलीस पाटील यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये दौंड गोपाळवाडी गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल होले यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे,
प्रथम क्रमांक – विठ्ठल होले तंटामुक्ती अध्यक्ष
द्वितीय क्रमांक — सचिन पोळ पोलीस पाटील देऊळगाव राजे,
तृतीय क्रमांक — योगेश बोबडे पोलीस पाटील आलेगाव
प्रथम क्रमांक – सौ. ज्योती सुभाष भिसे पाटील ( कामठ वाडी)
द्वितीय क्रमांक – सौ.अश्विनी दत्तात्रय सोनवणे (कासुर्डी)
तृतीय क्रमांक – मीनाक्षी गौतम आवटे ( नानविज)
तसेच उत्कृष्ट काम केल्या बद्दल उत्तेजनार्थ विलास येचकर पाटील( पांढरेवाडी) यांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले,रोटरी क्लब ऑफ दौंड च्या वतीने शांतता पुरस्काराचे वितरण
एस आर पी एफ ग्रुप 7 चे समादेशक सीनियर आयपीएस ऑफिसर माननीय श्री वसंतराव परदेशी साहेब, एस आर पी एफ ग्रुप 5 च्या समादेशक सीनियर आयपीएस ऑफिसर श्रीमती विनीता साहू मॅडम, दिवाणी न्यायाधीश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती जे एस खेडकर- गोयल मॅडम यांना रोटरी क्लब दौंड च्या वतीने शांतता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले
तसेच दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री भाऊसाहेब पाटील साहेब, श्री तुकाराम राठोड साहेब, श्री शहाजी गोसावी साहेब यांना रोटरी शांतता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
दौंड तालुक्यातील पोलीस पाटील व महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष यांच्यासाठी घेण्यात आलेल्या आदर्श तंटे सोडवण्याच्या स्पर्धेमधील विजेते पोलीस पाटील व तंटामुक्तीचे अध्यक्ष यांना रोटरी क्लब दौंड च्या वतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले,तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब दौंडचे अध्यक्ष डॉ राजेश दाते यांनी केले, तसेच सूत्रसंचालन रोटरी क्लबचे सचिव अमीर शेख यांनी व आभार प्रदर्शन सर्विस प्रोजेक्ट डायरेक्टर प्रज्ञा राजोपाध्ये यांनी केले.