एरंडोल(प्रतिनिधी): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गाला पूर तालुका एरंडोल याठिकाणी समता प्रबोधन मेळावा दिनांक १४ जानेवारी मंगळवार रोजीसंपन्न झाला. बार्टी पुणे चे समता दूत अर्जुन गायकवाड यांनी जीवनात समतेला खूप महत्त्व असल्याचे विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक तथा शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर होते. यावेळी समता दूत अर्जुन गायकवाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समता विषयक मूल्य सांगितली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेश भील, सखाराम भील सुनील भील तसेच पालकांनी परिश्रम घेतले.
शाळेची विद्यार्थिनी नंदिनी भील आरती पवार ओम पवार योगेश सोनवणे शिवनेर भिल आनंदा भिल रोहित भील यांनी मनोगत व्यक्त केले.
समता मेळाव्याच्या अध्यक्षीय समारोपात बोलताना मेळाव्याचे अध्यक्ष किशोर पाटील कुंझरकर म्हणाले की,भारतीय संविधानाने समतेला अनन्यसाधारण असे महत्त्व दिलेले असून जीवनात सर्वत्र समता प्रस्थापित होण्यासाठी सर्वांनी मिळून पुढे येण्याची व कृतीयुक्त आचरणाची गरज आहे.त्यादृष्टीने केंद्र व राज्य शासन तसेच विविध सेवाभावी संस्था सातत्याने पुढाकार घेत आहेत. आपल्या भावी जीवनात विद्यार्थ्यांनी समतेची कास धरावी असे पुढे बोलताना किशोर पाटील कुंझरकर म्हणाले.
रेखा भील कविता भील सीमा सोनवणे शबाना शेख आदींचे सहकार्य लाभले.
Read Time2 Minute, 29 Second