चाळीसगाव(प्रतिनिधी):- आज दि 20 एप्रिल रोजी वाडे गाव ,तालुका-भडगाव येथील दिलदार शेतकरी रखुनाथ फुला माळी यांनी मनाचा मोठेपणा दाखवत पुढे येऊन गरीबांना मदत म्हणून त्यांच्या शेतातील 2500 किलो उत्कृष्टरित्या पिकवलेली केळी कोरोना विषाणूच्या प्राधुरर्भावामुळे हाल अपेष्टा सहन करीत असलेल्या गरीब व गरजू व्यक्तींना द्यायचा मनोदय व्यक्त केल्याने, त्यापैकी 600 किलो केळी चाळीसगाव परिमंडळचे अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन गोरे सो यांच्या समन्वयाने व चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कैलास गावडे सो यांचा मार्गदर्शनात,
चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पो नि विजयकुमार ठाकूरवाड यांचे उपस्थितीत, चाळीसगाव शहराचे सपोनि आशिष रोही, सपो नि मयूर भामरे, पो उप नि महावीर जाधव, पो उप नि मछिन्द्र रणमाळे, पो उप नि विजय साठे व चाळीसगाव शहर पोलीस ठाणेच्या सर्व अंमलदार यांच्या मार्फतीने चाळीसगाव शहरातील गरीब व गरजू व्यक्तींना त्यांचे राहते ठिकाणी जाऊन केळी वाटप करण्यात आली आहे.
Read Time1 Minute, 37 Second