श्रीमती गिताबाई मुकनदास बंब प्राथमिक शाळा दौंड शाळेचे बालकलाकार नाट्यस्पर्धेत प्रथम….

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ,पुणे व जिल्हा परिषद ,पुणे यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यशवंतराव चव्हाण अंतरशालेय नाट्य स्पर्धा व पु ल देशपांडे करंडक २०२२-२३… मध्ये श्रीमती गिताबाई मुकनदास बंब प्राथमिक शाळा दौंड या शाळेतील बालकलाकारांनी सादर केलेल्या मार्केटिंग एक भन्नाट आयडिया या नाटिकेस तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळाला,त्याबद्दल नुकताच या बालकलाकारांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.
विद्यार्थी हा ज्ञानाभिमुख असावा व ज्ञान हे समाजाभिमुख असावे या क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा जोपासत विद्यार्थी हा फक्त नोकरीसाठी शिक्षण न घेता आपल्या शिक्षणाचा उपयोग करून आपल्या घरातील, परिसरातील छोटा व्यवसाय मोठा करून उद्योगाकडे त्याची वाटचाल होईल या उद्देशाने प्रशालेच्या उपशिक्षिका सौ.सुनिता लोंदे लिखित मार्केटिंग एक भन्नाट आयडिया या नाटिकेस प्रथम क्रमांक प्राप्त झाला.तसेच उत्कृष्ट अभिनय म्हणून कुमारी तनिष्का अर्जुन डोईजड या विद्यार्थिनीस पारितोषिक मिळाले.मार्गदर्शन मुख्याध्यापिका सौ..सुषमा पानसरे, दिग्दर्शन श्री.बाजीराव घोरपडे, सहकार्य सौ.मनिषा पवाळ व श्री.आनंद विणके..
पारितोषिक वितरण समारंभात भिमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव माननीय श्री.. प्रेमसुखजी कटारिया,भिमथडी शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय श्री.. विक्रमशेठजी कटारिया,प्राचार्य श्री खाडे सर, तालुकास्तरीय नाट्य स्पर्धेचे समन्वयक श्री.. काकडे सर ,दौंड येथील सुप्रसिद्ध डॉक्टर श्री.दाते सर, शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय श्री.. घोडके सर, दौंड येथील प्रसिद्ध कलाकार श्री.. गणेश लोणकर सर व प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.सुषमा पानसरे यांनी सर्व बालकलाकारांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले..