संपादक गफ्फार मलिक(शेख)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
मुंबई – मुंबई येथील आझाद मैदानावर दि.२२ फेब्रुवारी रोजी सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जवाब दो आंदोलन महामोर्चा चे आयोजन करण्यात आले होते राज्यातून मोठ्या संख्यने सकल मातंग समाज बांधवांनी या मोर्चात सहभाग नोंदविला.
सदर जवाब दो आंदोलनात समाजाला येणाऱ्या विविध समस्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या व अनेक मागण्या देखील करण्यात आल्या समस्त मातंग समाजा बांधवांच्या वतीने शासनाकडे अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये अ ब क ड नुसार वर्गीकरण झालेच पाहिजे,बार्टीच्या धर्तीवर आर्टी ची स्थापना झालीच पाहिजे,अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे.
अशा महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे करण्यात आल्या.यावेळी मानव हित लोकशाही पक्ष जिल्हाध्यक्ष गजानन चंदनशिव, लहुजी शक्ती सेना ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश कांबळे ,लहुजी शक्ती सेना महा उपअध्यक्ष अण्णा कांबळे,लहुजी शक्ती सेना कोर कमिटी सदस्य राजू गायकवाड, लहुजी संघर्ष सेना उत्तर महा अध्यक्ष सुभाष पगारे व मोठ्या संख्येने सकल मातंग समाज बांधव उपस्थित होते.