
ससून हॉस्पीटलच्या नवीन इमारतीची जिल्हाधिकारी राम किशोर नवल यांच्याकडून पहाणी
पुणे(प्रतिनिधी):-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ससून हॉस्पीटलच्या नवीन इमारतीत 5 एप्रिलपर्यंत 50 आयसीयू (इंटेन्सिव्ह केअर यूनिट) आणि 100 आयसोलेशन बेड तयार होणार असून या बाबतच्या कामांची पहाणी जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी केली. यावेळी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग, डॉ. हरीश ताटिया, डॉ. मुरलीधर तांबे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आयसीयू व आयसोलेशन बेड्सची तयारी करण्यात येत आहे. ससून हॉस्पीटलची नवीन इमारत 11 मजली असून 6 व नवव्या मजल्यावर रिफ्यूजी एरिया आहे. इमारतीतील सर्वच मजल्यावर आयसोलेशन बेड्सची सोय करण्यात येणार आहे.पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांच्याकडे रुग्णालय व अतिदक्षता विभागाचे व्यवस्थापन ही जबाबदारी देण्यात आली आहे. पहाणीनंतर अधिष्ठाता कक्षात बैठक घेण्यात आली. बैठकीत इमारतीच्या इतर अनुषंगिक बाबींच्या उपलब्धतेवर चर्चा करण्यात आली.संपूर्ण इमारतीच्या वातानुकुलीन यंत्रणेसाठी नवीन ट्रान्सफॉर्मर (जनित्र), जादा व्हेंटीलेटर, लॉकडाऊनमुळे उपलब्ध मनुष्यबळाच्या मदतीने गतीने काम करणे यावर चर्चा झाली.कोरोनाच्या मुकाबल्यासाठी शासनाचे सर्वच विभाग सक्षमपणे काम करत असून नवीन इमारतीत 700 हून अधिक बेड्स तयार करण्याचे आव्हान पूर्ण करु, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related
More Stories
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना...
जिल्हा रुग्णालयात कैद्यांची हाणामारी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव- जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कर्तव्यात कसूर...
धक्कादायक शहरात बोगस क्लीनिकल लॅब व पॅथॉलॉजीस्ट चा सुळसुळाट, आरोग्य यंत्रणा गप्प का?
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-कुठलाही छोटा-मोठा आजार असो, अनेकदा आजाराचे अचूक आणि योग्य निदान होण्यासाठी रुग्णांच्या विविध...
विविध क्षेत्रातील ४३ मान्यवरांचा आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगांव-जळगाव जिल्ह्यातील अडावद येथील नामांकित "आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थे" मार्फत रविवार ८ मे...
Average Rating