रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव ,रोटरी RCC सायगाव, व गुरूकूल इंग्लिश मिडीयम स्कूल सायगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सायगाव येथे गुरुकूलचे अध्यक्ष तथा युवा सेना (मविसे) जिल्हाध्यक्ष भुषण सुर्यवंशी यांचे वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
विश्व राजभारती शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे मार्गदर्शक राजेंद्र सुर्यवंशी यांच्या हस्ते शिबीराचे उदघाटन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चाळीसगाव येथील रोटरी RCC अध्यक्ष डॉ.संदीप देशमुख यांनी स्वामी विवेकानंद प्रतिमा पुजन करून शिबीरास सुरुवात केली ,यावेळी रोटरी RCC सचिव रोशन ताथेड,मुक्ताई संस्थेचे तुषार सुर्यवंशी,राजाराम भाबड ,धनराज सुर्यवंशी,पंकज मगर,ग्रा.प.सदस्य मारोती काळे,सोसायटीचे मा.चेअरमन दिलीप शिरोडे ,नामदेव सोळुंके,दत्तू परदेशी,ज्ञानेश्वर महाले,संदीप गिते,ज्ञानेश्वर पगार,दिनेश सुर्यवंशी,संदीप थोरे अमृत सोळुंके,राहूल माळी,सुनिल मरसाळे,पुंजाराम देवरे,अरूण महाले, उपस्थित होते.
शिबीरात डॉ.संदीप देशमुख,डॉ.सुधन्वा कूलकर्णी,डॉ.संदीप शाहू,डॉ.राहूल महाजन,या तज्ञ डॉक्टरांकडून रुगणांची तपासणी करण्यात आली.गुरूकूल संस्थेकडून सर्व डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
पंचक्रोशीतील सुमारे २०० ते २५० रुग्णांची यावेळी तज्ञ डॉक्तरांकडून नेत्र तपासणी, स्त्री रोग व बाल रोग, तपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी तसेच इतर तपासण्या करण्यात आल्या व मोफत औषधाचे वाटप करण्यात आले तर मोतीबिंदू आढळलेल्या १५ रुग्णांसह शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या इतर रुग्णांवर लवकरच मोफत शस्त्रक्रीया करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एच बी अहिरे यांनी केले ,शिबीर यशस्वीतेसाठी विनायक ठाकरे,मयुर कोळी,बाळू गोपाळ संस्थेचे सचिव शुभम सुर्यवंशी,एम एन माळी,व्ही डी सोनवणे,जे एस शर्मा,एस एस आहेर,सचिन पगार,राहूल वाघ यांनी मेहनत घेतली.