अधिकार आमचा न्युज नेटवर्क
दौंड प्रतिनिधी पवन साळवे
आज दि.27/05/2020 रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक पुणे विभाग,पुणे. या पथकाने सकाळी पहाटे 4:00 वाजता बोरीएनदी ता.दौंड जि. पुणे या ठिकाणी हातभट्टी निर्मिती केंद्रावर छापा मारला असता एका बेवारस गुन्ह्याची नोंद करून 5400 लि.रसायन 525 लि. गावठी दारू व इतर असा एकूण 1,50,950/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अवैध दारू धंद्यावर दौंड तालुक्यात होणाऱ्या वारंवार मोठ्या कार्यवाह्यामुळे अवैद्य दारू धंदे करणाऱ्याचे धाबे दणाणले, व अवैध दारू धंद्याचे पूर्णपणे कंबरडे मोडले आहे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक पुणे विभाग, पुणे. (Flying scaod)यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मा निरीक्षक साहेब श्री नंदकुमार जाधव साहेब,यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या या कार्यवाही मध्ये उप निरीक्षक मा श्री एस, आर, गायकवाड, साहेब, अमर कांबळे साहेब, शशांक झिंगले साहेब, अहमद शेख,साहेब, भरत मेमांडे,साहेब व प्रताप कदम साहेब यांनी सहभाग घेतला, महाराष्ट्र राज्य दारुबंदी समिती कडून सर्व टीम चे मनापासून अभिनंदन व परिसरातील महिला वर्गातून सदर कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे,