८ ते ९ गावांचा संपर्क जोडणाऱ्या मोरीची तात्पुरती दुरुस्ती लवकरच निधी पण मिळणार आमदार चव्हाण यांचे आश्वासन

1 0
Read Time3 Minute, 31 Second

संपादक गफ्फार मलिक(शेख)

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

चाळीसगांव(प्रतिनिधी)-तालुकायतील जवळपास ८ ते ९ गावांचा थेट संपर्क असणाऱ्या तांबोळे गावाजवळील पाईपमोरी खचल्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. याठिकाणी भराव टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्यात यावी अश्या सूचना आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला दिल्या असता आज त्यांच्या देखरेखीखाली प्रत्यक्षात दुरुस्ती काम सुरू करण्यात आले आहे.
तांबोळे गावाजवळील डोंगरी नदीवर मोठा आणि उंच पूल उभारण्यात यावा अशी मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. अनेकदा याठिकाणी पाईपमोरीवरून पुराचे पाणी जात असल्याने या गावांचा संपर्क तुटला होता व जीवितहानी देखील झाली होती.मागील वर्षी अतिवृष्टीमुळे या पाईपमोरीचे मोठे नुकसान झाले होते. चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या रस्त्यांच्या व पुलांच्या कामांना निधी मिळावा यासाठी सातत्याने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांकडे निधीची मागणी केली होती मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले तसेच सदर रस्ता हा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येत असल्याने आमदार निधीतून स्टेट बजेट फंड मधून निधी मंजूर करण्यासाठी अडचणी येत होत्या मात्र तरीदेखील नाबार्ड असो की मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असो ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी हा पूल मी मंजुरीसाठी प्रस्तावित केला होता.
मात्र सद्यस्थितीत पाईपमोरीची झालेली अवस्था बघता महापुरात ही संपुर्ण पाईपमोरी वाहून जाण्याची दाट शक्यता आहे.म्हणून सदर पुलाच्या मंजुरीसाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून त्यांना जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करून देण्याची विनंती देखील केली आहे. जिल्हाधिकारी महोदय यांनी देखील यासाठी सकारात्मकता दर्शवली आहे.
लवकरच DPDC सदर मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी निधी मंजूर होईल व निविदाप्रक्रिया पार पडून कामाला लवकरात लवकर सुरुवात होईल यासाठी सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात असल्याचे देखील आमदार चव्हाण यांनी सांगितले.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.