Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

पक्षासाठी लढणारा भाजपचा कार्यकर्ता कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमदार मंगेश चव्हाण – माजी आमदार साहेबराव घोडे

0
2 0
Read Time8 Minute, 51 Second

अधिकार आमचा न्युज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे

चाळीसगाव(प्रतिनिधी)– दि २५ शहरातील राजपूत मंगल कार्यालय येथे चाळीसगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मंगेश चव्हाण यांची जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्या रुपाने चाळीसगाव तालुक्याला जळगाव जिल्हात मानाचे स्थान मिळाले, दुध संघात चाळीसगाव तालुक्याची मान उंचावली त्यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार मंगेश चव्हाण यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. तसेच नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेले नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा देखील श्री विठ्ठलाची मूर्ती, बागायतदार रुमाल, भेट देऊन व भगवा फेटा बांधून आमदार मंगेश चव्हाण व भारतीय जनता पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केल्यास तसेच आपल्या नेतृत्वाचा आणि जनतेचा विश्वास संपादित केल्यास आपल्याला पद आणि जबाबदाऱ्या मागायची वेळ येत नाही तर त्या जबाबदाऱ्या आपसूकपणे आपल्याकडे येतात. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व ग्रामविकासमंत्री गिरीषभाऊ महाजन तसेच राज्य शासनाच्या व विकास दुध संघाच्या माध्यमातून येत्या काळात किमान १ हजार कोटी रुपयांची विकासकामे चाळीसगाव तालुक्यात आणायची असून त्यातील ७० टक्के कामे आपल्या कालावधीतच पूर्ण होतील यासाठी प्रयत्न करणार आहे.

तसेच नवीन निवडणुका झालेल्या २२ ग्रामपंचायतीना प्रत्येकी २५ लाखांचा निधी देण्याचे देखील त्यांनी जाहीर केले.सोबतच ज्याप्रमाणे आजपर्यंत आशा-अंगणवाडी सेविकांच्या मुलींच्या जवळपास ५० लग्नांसाठी मामा म्हणून प्रत्येकी २५ हजारांची मदत केली त्याचप्रमाणे चाळीसगाव तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचा कणा असणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी २० लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्याची घोषणा आमदार चव्हाण यांनी केली.

माजी आमदार साहेबराव घोडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, पक्षासाठी लढणारा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमदार मंगेश चव्हाण होय… जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रमाणे सहकारात देखील भाजपा पुढे गेल्यास निश्चितपणे त्याचा फायदा पक्षाला व कार्यकर्त्यांना होतो मात्र जिल्हा बँक निवडणुकीच्या वेळी भाजपाला माघार घ्यावी लागली असता मी याबाबत खासदारांकडे नाराजी व्यक्त केली होती. मात्र ती कसर आमदार मंगेश चव्हाणांनी दुध संघाच्या निवडणुकीत भरून काढली. पूर्ण जागा बिनविरोध करा मात्र मी मुक्ताईनगर मधूनच लढणार असा निर्धार त्यांनी केला आणि आज त्या एका भूमिकेमुळे भाजपला दूध संघात घवघवीत यश मिळाले. दुसऱ्या मतदारसंघात जाऊन विजय तर मिळविलाच मात्र विजयी झाल्यानंतर त्यांनी विजयाचे श्रेय त्यांनी खडसेंच्या अहंकाराला देत सर्वांची मने जिंकली. मंगेश चव्हाणांच्या मामाचे घर माझ्या शेजारी असल्याने अगदी लहानपणापसून त्यांचा संघर्ष मी बघत आलो आहे. त्यांनी स्वकर्तृत्वाने आजपर्यंत मिळविले असून नेतृत्व, दातृत्व, कर्तुत्व आणि सहृदयत्व याचा संगम मंगेश चव्हाण आहे. त्यामुळे त्यांचे भविष्य उज्वल असल्याचे प्रतिपादन माजी आमदार घोडे यांनी केले.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस मधु भाऊ काटे, सचिन पान पाटील, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे, जिल्हा उपाध्यक्ष के बी दादा साळुंखे, ज्येष्ठ नेते सुरेश तात्या सोनवणे, आनंदा अण्णा पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष प्राध्यापक सुनील निकम सर, शहराध्यक्ष घृष्णेश्वर तात्या पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, पंचायत समिती माजी सभापती संजय भास्करराव पाटील, माजी नगरसेवक संजय रतन सिंग पाटील, माजी नगराध्यक्ष आशालताताई चव्हाण, जेष्ठ नेते विश्वासभाऊ चव्हाण, माजी मार्केट सभापती मच्छिंद्र भाऊ राठोड, रवी आबा पाटील, सरदार शेठ राजपूत, ज्येष्ठ नेते राजू अण्णा चौधरी, रमेश सोनवणे सर, ए ओ पाटील सर, शेषराव बापू पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल भाऊ नागरे, माजी पंचायत समिती सदस्य दिनेश भाऊ बोरसे, सरचिटणीस धनंजय मांडोळे, गिरीष बऱ्हाटे, दूध संघ संचालक रावसाहेब भोसले, भाजपा भडगाव तालुकाध्यक्ष अमोल दादा पाटील, जिल्हा चिटणीस सोमनाथ भाऊ पाटील, प्रेमचंद काही खिवसरा, नमोताई राठोड, विजयाताई प्रकाश पवार, विजयाताई भिकन पवार, रिजवानाताई खान, एडवोकेट धनंजय ठोके, हेमराज बाविस्कर, किशोर भाऊ पाटील, नितीन भाऊ पाटील, बाळासाहेब राऊत, आबा पाटील पोलीस, सुभाष दादा पाटील, रवी बापू पाटील, चिराग शेख, चंदू भाऊ तायडे संभाजी राजे पाटील, पियुष दादा साळुंखे, अलक नंदाताई भवर, राजू बाबू राठोड, डॉक्टर महेंद्र राठोड, अमोल नानकर, जितेंद्र वाघ, भैय्यासाहेब पाटील, जगदीश सूर्यवंशी, ज्ञानेश्वर बागुल, महेश शिंदे, अयास पठाण, शिवदास महाजन, सुनील पवार यांच्यासह नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, पंडित दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. भाजपा शहर व ग्रामीण मंडळाच्या वतीने आमदार मंगेश चव्हाण यांना सन्मानपत्र देणून गौरविण्यात आले. तसेच मधुभाऊ काटे, के बी दादा साळुंखे, घृष्णेश्वर पाटील, अमोल नाना पाटील, रवि बापू पाटील, सरपंचांच्या वतीने शैलेंद्रसिंग पाटील, जितेंद्र वाघ यांनी आपली यथोचित मनोगते व्यक्त केली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: