चाळीसगांव शहर पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली जळगांव नियंत्रण कक्षात केले संलग्न…

11 7
Read Time1 Minute, 48 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक

चाळीसगांव(प्रतिनिधी)- शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक कांतीलाल पाटील यांची तडकाफडकी जळगांव नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी 7 जुलै 2022 ला हा आदेश दिला आहे.

ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याकडे तात्पुरता शहर पोलीस ठाण्याच्या प्रभार सोपविण्यात आला आहे. पाटील यांची अचानक तडकाफडकी बदली झाल्याने शहरात चर्चांना उधाण आले आहे मात्र तडकाफडकी बदलीचे चे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलीस निरीक्षक यांच्यावरील चौकशीच्या अनुषंगाने त्यांना तात्पुरत्या स्वरूपात नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले असावे असा अंदाज वर्तविण्यात येत असून,पुढील आदेश होईपर्यंत पोलीस निरीक्षक पाटील संलग्न राहतील. त्यांच्याविरोधात नेमकी कुठली चौकशी सुरू आहे याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही.पोलीस निरीक्षक पाटील यांनी ऑगस्ट 2021 मध्ये चाळीसगांव शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला होता.जवळपास एक वर्षापासून ते शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते.

Happy
Happy
9 %
Sad
Sad
66 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
4 %
Surprise
Surprise
21 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.