Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

नुसते डोनेशन कडे लक्ष?मुलांच्या आरोग्याचे काय?तहेजीब शाळेतील केजी सिनियर केजी च्या पालकांचा सवाल.

0
0 0
Read Time2 Minute, 42 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक

चाळीसगांव(प्रतिनिधी)-शहरातील मुस्लिम समाजातील नामांकित तहेजीब उर्दू शाळा अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या केजी व सिनियर केजी च्या वर्गांबाहेर पावसामुळे साचले पाणी व चिखल, विध्यार्थी व पालकांना करावी लागते कसरत मात्र संस्था चालकांचे सोयीस्कर पणे दुर्लक्ष.

केजी व सिनियर केजी च्या ऍडमिशन साठी 3 हजार 500 रुपये डोनेशन च्या नावाने घेतले जात आहेत,त्या पैश्यातूनच पाल्यांना सुख सुविधा मिळत नसतील तर नेमकं या पैश्याचा वापर कश्यासाठी होणार असल्याची देखील चर्चा रंगली आहे.


पाण्याची रिप रिप सुरू असून शाळा देखील नियमित पणे सुरू झाल्या आहेत पावसाळ्यात विविध आजार तोंड वर काढत असतात त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष दिले जात असते पण शाळेतील आवारातच जर पाणी साचले असेल व चिखल होत असेल तर या कडे दुर्लक्ष करून जसे चालणार असाच काही कारभार तहेजीब उर्दू शाळे अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या केजी व सिनियर केजी च्या वर्गांच्या आवारात सुरू असून आवारात पाणी साचल्याने परिसरात चिखल झाला आहे,या चिखलातून 4 ते 5 वयोगटातील बालकांना पालकांसोबत कसरत करून जावे लागते व या साचलेल्या पाण्यामुळे या पाण्याच्या सानिध्यात विविध प्रकारच्या कृमिकिटकांची वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातूनच जलजन्य आजारांची बाधा सुद्धा होऊ शकते.ज्याचे परिणाम बालकांच्या आरोग्यावर होऊ शकतात त्यामुळे संस्था चालकांनी सदर परिसरात मुरूम टाकून काही तरी उपाययोजना करावी अशी मागणी पालकांतर्फे करण्यात येत असून संस्था चालकांनी नुसती फी ची काळजी न करता बालकांच्या आरोग्याची काळजी पण करावी.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
100 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: