CSR फंड सामाजीक उपक्रमाअंतर्गत 10 बँरीकेट भेट,ग्रामीण कुटा फायनान्स कंपनी चे शहर पोलीस निरीक्षकांनी पोलीस दलादर्फे मानले आभार.

संपादक गफ्फार मलिक (शेख)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-क्रेडीट एक्सेस ग्रामीण लि. (ग्रामीण कुटा) (NBFC-MFI) मायक्रो फायनान्स कंपनी, चाळीसगांव शाखेचे एरीया मँनेजर श्री माधव शिंदे, ब्रॉच मँनेजर श्री शैलेश शिरसाठ, केंद्र मँनेजर निलेश वळवी, उपशाखा अधिकारी श्री भैय्या पाटील यांनी CSR फंड सामाजीक उपक्रमाअंतर्गत 66 हजार 450 रुपये किमतीचे 10 लोखंडी बँरीकेट चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनला CSR फंडातुन भेट म्हणुन दिलेले आहेत.
क्रेडीट एक्सेस ग्रामीण लि.(ग्रामीण कुटा) (NBFC-MFI) मायक्रो फायनान्स कंपनी, चाळीसगांव शाखेच्या वतीने पोलीस प्रशासनास भेट दिलेले बँरीकेट्स हे वेळोवेळी नाकाबंदी कामी, अवजड वाहतुकीस शहरातुन प्रतिबंध करण्याकामी, सण उत्सव, जयंती मिरवणुक, व्हि.आय.पी. बंदोबस्त, तसेच वेळोवेळी चाळीसगांव शहरात होणाऱ्या कायदा व सुव्यवस्था बंदोबस्ताकामी उपयोगी व फायदेशीर ठरणार आहेत असे यावेळी शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यांनी सांगितले
तसेच पोलीस विभागाच्या वतीने क्रेडीट एक्सेस ग्रामीण लि. (ग्रामीण कुटा) (NBFC-MFI) मायक्रो फायनान्स कंपनी, चाळीसगांव शाखेचे आभार देखील मानले.