मोबाईल चोरी प्रकरणी आरोपीची चौकशी करत असतांना मंदिराची दान पेटी देखील चोरी केल्याची आरोपीची शहर पोलिसांकडे कबुली…

संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
घरातून मोबाईल चोरी गेल्याच्या तक्रारीवरून शोध पथक तयार करून आरोपीला ताब्यात घेत कसून चौकशी करत,चोरीचा मोबाईल ताब्यात घेतला आणि शहरातील गणेश रोड वरील गणेश मंदिरातील दान पेटी देखील चोरल्याची आरोपीने कबुल केले असून आजून तपासात काही गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याने न्यायालयात हजर करून पोलीस कस्टडी मागणार-पोलीस निरीक्षक संदीप पाटील
चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील सिंधी कॉलनी येथे रात्रीच्या वेळी घरातून 20 हजार रुपये किमतीच्या मोबाईलची चोरी मालकाची पोलिसांकडे धाव गुन्हा दाखल होताच तपास चक्र फिरवत आरोपीला फरार होण्याआधी रेल्वे स्थाकातून शहर पोलिसांनी घेतले आरोपीला ताब्यात.
याबाबत सविस्तर वृत्त असे घरातून मोबाईल चोरी झाल्याचे लक्षात येताच दि 4 सप्टेंबर रोजी सिंधी कॉलनी येथील रहिवासी रिंकेश हरीनाम पवानी यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत ४३९ / २०२३ भादवी कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर लागलीच तात्काळ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी तक्रारीची दाखल घेत पथक नेमून तपास करण्याचे आदेश दिले परिसरात जाऊन विचार पूस केली असता दिड महिन्यापुर्वी जेल मधुन जामिनावर सुटुन आलेला सराईत चोरटा युवराज साळुंखे रा. संजय गांधी नगर चाळीसगाव हा संशयित रित्या परिसरात फिरत असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली होती त्या माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेतला असता सदर आरोपी पसार होण्यासाठी रेल्वे स्थानकात केला असल्याची माहिती मिळाली तात्काळ पथकाने रेल्वे स्थानकातून संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास सदर आरोपीस ताब्यात घेत विचार पूस केली असता गुन्ह्याबाबत कबुली देत गुन्ह्यातील चोरलेला 20 हजार रुपये कि.चा मोबाईल फोन काढुन दिला सोबतच गणेश रोड वरील गणेश मंदिराची दानपेटी देखील चोरली असल्याची कबुली दिली आहे सदर आरोपीवर शहर पोलीस ठाण्यात यापूर्वी देखील चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
या कारवाई साठी नेमलेल्या पथकातील पोलीस उप-निरीक्षक सुहास आव्हाड, पोहेकॉ योगेश बेलदार, पोना दिपक पाटील, पोकॉ निलेश पाटील, अमोल भोसले, विनोद खैरनार, नंदकिशोर महाजन, गणेश कुवर, मोहन सुर्यवंशी, शरद पाटील, प्रविण जाधव आदींनी गुन्हा उघड करत आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोना दिपक पाटील व पोकॉ अमोल भोसले करीत आहेत.