अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
कास्ट्राईब शिक्षक महासंघ शिक्षकांच्या सुखदुःखात नेहमीच सामील आहे ही छोटेखानी मदत म्हणजे आमचे कर्तव्य असून महासंघाच्या एकीचे बळ आहे महासंघ नेहमीच शिक्षकांच्या पाठिशी आहे- राज्याध्यक्ष गौतम कांबळे(कास्ट्राईब शिक्षक महासंघ)
दौंड(प्रतिनिधी)-ग्रामपंचायत निवडणूक २०२२ च्या निवडणूक कामकाजासाठी जात असताना अपघातात मृत्युमुखी पडलेले कालकथित सागर नामदेव देशमुख यांच्या कुटुंबीयांना ४ लाख ७७ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली . ते जि. प . प्राथमिक शाळा कंधारवस्ती ( पोळे ) केंद्र शिरकोली तालुका वेल्हे जिल्हा पुणे येथील शाळेत कार्यरत होते .या आर्थिक मदतीकरिता महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे सभासद , माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे , वेल्ह्याचे तहसीलदार विशाल शिंदे , वेल्हा पंचायत समितीचे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे ,पोळे गावचे ग्रामस्थ व मुख्याध्यापक, शिक्षक बंधू-भगिनी, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी हेमंत कांबळे ,विठ्ठल सावंत , बाळू लोंढे ,अनिल सरोदे ,दीपक खवले ,दत्तात्रय कळंबे व केशव मोरे यांचे सहकार्य मिळाले . तसेच वेल्हे व मुळशी तालुक्यातील विविध शिक्षक संघटना पदाधिकार्यांनी सहकार्य केले .