संपादक गफ्फार मलिक(शेख)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि 5 श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या 663 व्या जयंतीनिमित्त चाळीसगाव शहरातील मोची गल्ली तसेच तालुक्यात कडमडु,तळेगाव,वडगाव,पातोंडा तसेच संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
बहाळ या गावी संत रोहिदास महाराज यांच्या मूर्तीच्या अनावर करण्यात आले.बहाळ येथे मुर्ती अनावर सोहळा सर्व समाजाच्या साक्षीने पार पडला. यावेळी चर्मकार समाज उन्नत आणि प्रगत झाला पाहिजे यासाठी महापुरुषांचे विचार प्रेरणादायी असून त्याचे साहित्यरूपी विचार घराघरात पोहचले पाहिजे असे प्रतिपादन चर्मकार उठाव संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मोतीलाल अहिरे यांनी केले.
यावेळी चाळीसगाव व्यापारी आघाडी प्रमुख देवेंद्र गांगुर्डे तालुका अध्यक्ष आनंद गांगुर्डे,, शहर अध्यक्ष खुशाल मोरे , सागर गांगुर्डे , सामाजिक कार्यकर्ते ,रविंद्र कोष्टी ,सुपडू चौधरी,सोमनाथ गायकवाड, वसंत मरसाळे,जगदीश महाजन, भैय्या सुर्यवंशी, विनोद बैरभैय्या ,गणेश सुरवाडे,नाना साखरे,गंगाराम तेली तसेच बहाळ चे माजी सरपंच रविंद्र बोरसे ,उत्तम बोरसे, भुषण अहिरे,भगवान बोरसे,पोपट बोरसे,देविदास बोरसे, साहेबराव बोरसे,धनराज बोरसे,रमेश बोरसे,करमडु येथील संजय देवरे,प्रशांत मोरे,शिवाजी मोरे ,भाईदास मोरे ,देविदास मोरे,विजेंद्र देवरे,राहुल मोरे,अमोल मोरे,पंकज मोरे,अविनाश देवरे,सचिन मोरे, विवेक मोरे तसेच तळेगांव येथील युवराज मोरे,शरद बोरसे, आत्माराम बोरसे,सुदाम मोरे,राघो मोरे ,आधार मोरे,सचिन मोरे,समाधान अहिरे,यांची उपस्थिती होती.