जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी डिसेंबर २०२२ अखेरच्या रिक्त जागा दाखवण्यात याव्या-गौतम कांबळे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेसाठी डिसेंबर २०२२ अखेर सेवानिवृत्त तथा अन्य कारणांमुळे रीक्त होणाऱ्या जागांचा बदली प्रक्रीयेत समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी मेलद्वारे केलेल्या निवेदनात केली आहे .या मागणीचे निवेदन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, त्यांचे कार्य निष्पादन अधिकारी पाटीलसाहेब , ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव , उपसचिव व प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रिया समितीचे अध्यक्ष तथा पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना पाठवल्या आहेत .याविषयी आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की ,प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू होणार आहे व बदली झालेल्या शिक्षकांना बदली आदेश ५ जानेवारी २०२३ रोजी देण्यात येणार आहेत. दरम्यानच्या काळात अनेक शिक्षक सेवानिवृत्त होणार आहेत तसेच अनेकविध कारणामुळेही प्राथमिक शिक्षकांच्या जागा रिक्त होत आहेत या रिक्त जागा भरणे गरजेचे आहे . या जागा रिक्त राहिल्यास शालेय कामकाजाचे नियोजन करणे अवघड होणार आहे . अगोदरच समानिकरणाच्या निमित्ताने अनेक जागा रिक्त ठेवण्यात येतात , त्यामुळे शालेय व्यवस्थापन , वर्ग नियोजन करणे, अध्यापन करणे या बाबी कठीण झालेल्या आहेत . त्यामुळे डिसेंबर 2022 अखेर सेवानिवृत्ती किंवा अन्य कारणामुळे रिक्त होणाऱ्या जागा बदली प्रक्रिये दरम्यान भरणे गरजेचे आहे . त्यामुळे शालेय व्यवस्थापन करणे सोयीचे होणार आहे .प्रशासनाने या बाबीकडे दुर्लक्ष केल्यास शालेय कामकाजात विस्कळीतपणा येणार आहे व त्याचे खापर प्राथमिक शिक्षकांच्या माती फोडले जाणार आहे . या सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून डिसेंबर २०२२अखेरच्या सर्व रिक्त जागा बदली प्रक्रिया दरम्यान भरण्यात याव्यात अशी मागणी मेलमार्फत पाठवलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे .यावेळी राज्य महासचिव विठ्ठल , पुणे जिल्हाध्यक्ष विनोद , उपाध्यक्ष बालाजी , मुळशी तालुकाध्यक्ष दशरथ , बारामती तालुकाध्यक्ष विनोदकुमार भिसे व महासचिव सतीश शिंदे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .