Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

महिलांना सक्षम करण्यासाठी कामयाब महिला बहुउद्देशीय संस्था कार्य करणार-संस्थापिका अध्यक्ष अंजुम लियाकत पठाण

0
0 0
Read Time3 Minute, 18 Second

संपादक गफ्फार मलिक(शेख)

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उंबरखेड(चाळीसगाव)-दिनांक 30 ऑक्टोबर 2022 रोजी उंबरखेड येथे कामयाब महिला बहुउद्देशीय संस्था उंबरखेड यांच्या वतीने स्वखर्चाने कामयाब महिला शिवन क्लास चे उदघाटन शिवनेरी फाउंडेशन च्या अध्यक्षा प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले व सोबतच महिलांना मॅरेज सर्टिफिकेटचे वाटप देखील करण्यात आले.
कामयाब महिला बहुउद्देशीय संस्था येणाऱ्या काळात बेटी भविष्यात महिलांच्या विविध समस्या व महिलांना सक्षम करण्याचे कार्य करणार असून बेटी बचाव बेटी पढाव समिती, महिला जनजागृती समिती अश्या विविध समित्या स्थापन करणार असून, वधुवर मेळावे घेणार, अल्पसंख्याक , आदिवासी व इतर समाजांच्या मुलींच्या शिक्षणासाठी काम करणार , महिलांसाठी गृहउद्योग निर्मिती करण्यात येईल, मेहंदी क्लास,ब्युटीपार्लर ,हस्तकला आदी विविध कला शिकवत महिलांना संस्था सक्षम करण्याचा प्रयत्न करणार आहे महिलांना सक्षम करण्यासाठी जे करता येईल ते नक्किच करणार असल्याचे कामयाब महिला बहुउद्देशीय संस्थापिका अध्यक्ष अंजुम लियाकत पठाण म्हणाल्या समाजात महिलांना प्रवाहात आणण्यासाठी महिलांसाठी या वेगवेगळ्या उपक्रम राबवले जातील.त्यावर शिवनेरी फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा प्रतिभाताई मंगेश चव्हाण यावेळी बोलतांना सांगितले की येणाऱ्या काळात या सर्व उपक्रमासाठी लागणारी मदत करु जेणे करुन महिला सक्षम होतील व देश सक्षम होईल.

यावेळी शिवनेरी फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभाताई मंगेश चव्हाण , जळगाव जिल्हा दुध संघ संचालिका सुनिता ताई राजेंद्र पाटील, चाळीसगाव नगरसेविका विजया ताई पवार , उंबरखेड येथील पोलिस पाटील अर्चना ताई , खडकि ग्रा.पं.सदस्य रिजवाना बाजी , मालेगाव, चाळीसगाव व ग्रामीण भागातील मान्यवर उपस्थित होते व गावातील सर्व महिला व नागरिक उपस्थित होते
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मुस्लिम पंच कमेटी अध्यक्ष राजु दादा पठाण ग्रा.पं.सदस्य लियाकत पठाण सर्व तरुण व जेष्ठ नागरिकांनी परिश्रम घेतले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: