चाळीसगांव(प्रतिनिधी):- आज दि 30 रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.विजयकुमार ठाकूरवाड साहेब यांचे मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मयूर भामरे, पोलीस अंमलदार भटु पाटील, भूषण पाटील, राहुल गुंजाळ, सतीश राजपूत, संजय पाटील या पथकाने सायंकाळी 16:25 वाजताचे सुमारास चाळीसगाव पोलीस स्टेशन हद्दीतील हिरापुर रोडवरील कैवल्य नगर भागातील साहेबराव पंडित पाटील यांचे घराचे शेजारी छापा टाकला असता, तेथे 8 जण 52 पत्त्यांवर जुगाराचे खेळावर पैसे लावून पत्ता जुगाराचा खेळ खेळताना मिळून आले.
सदर ठिकाणी रक्कम रुपये 6830 ताब्यात घेण्यात आली आहे तसेच आरोपींचे अंगझडतीत मिळालेले 8 मोबाइल एकूण किंमत रुपये 55000 असा एकूण 61830 रुपये किमतीचा सर्व मुद्देमाल गुन्ह्यात जमा करण्यात आला आहे.
सदर आरोपी जुगार खेळताना मिळून आले म्हणून त्यांना ताब्यात घेऊन त्यांचेवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला पोलीस अंमलदार भूषण मांगो पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा अन्वये तसेच कोरोना विषाणूचा अनुषंगाने जाहीर केलेल्या जमावबंदी व संचारबंदी आदेशांचे जाणीवपूर्वक उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकीकडे चाळीसगाव शहरातील जबाबदार नागरिक कोरोना विषाणूशी लढण्यासाठी सज्ज असून, स्वयंस्फूर्तीने पुढील तीन दिवस जनता करफ्यु पाळणार असताना, शहरातील पत्तेप्रेमींचा या वागण्याने संचारबंदीला गालबोट लागत आहे।
आरोपींची नावे-
1) भीमा धोंडिबा गवळी,
वय- 45 वर्षे , राहणार – पिरनवाडी, हिरापुर रोड, चाळीसगाव.
2) अण्णा रामा गवळी
वय- 43 वर्षे , राहणार- आदर्श नगर, हिरापुर रोड, चाळीसगाव
3) आप्पा बाळा गवळी
वय- 54 वर्षे ,
राहणार- आदर्श नगर, हिरापुर रोड, चाळीसगाव
4) राजू ज्ञानप्पा गवळी.
वय- 45 वर्षे ,
राहणार- इच्यादेवी मंदिराजवळ, हिरापुर रोड, चाळीसगाव
5) संजय दाजीबा गवळी
वय- 37 वर्षे ,
राहणार- पिरनवाडी, हिरापुर रोड,चाळीसगाव
6) जितेंद्र हरी सूर्यवंशी
वय- 46 वर्षे , राहणार- पद्मावती नगर,हिरापुर रोड, चाळीसगाव
7) राजेश सुदाम गवळी
वय- 55 वर्षे , राहणार- पिरनवाडी, हिरापुर रोड, चाळीसगाव
8) विठ्ठल राणोजी गवळी
वय- 47 वर्षे , राहणार- पिरनवाडी, हिरापुर रोड, चाळीसगाव
चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या वतीने विनाकारण घरातून बाहेर न पडण्याचे व कोरोना विषाणूच्या अनुषंगाने शासनाने दिलेले आदेशांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.