अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-तक्रारदार यांची विवाह नोंदणी प्रमाणपत्राची दुबार प्रत देण्यासाठी दौंड उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक व शिपाई यांनी तक्रारदार यांच्याकडून
एकूण पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा रुचून रंगेहात पकडले आहे.
तक्रारदार यांच्या कडून विवाह प्रमाणपत्राची दुबार प्रतची उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात मागणी करण्यात आली होती मात्र दुबार प्रत देण्यासाठी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी यांनी शिपायाद्वारे लाचेची मागणी केल्याची तक्रार लाच लुचपत विभागास केली होती या तक्रारीची दखल घेत लाचलुचपत विभागाच्या अधिकारी यांनी सापळा रचत प्रभारी वैद्यकीय अधीक्षक संग्राम माणिकराव डांगे 46 वर्षे आणि शिपाई नानासाहेब पांडुरंग खोत वय 57 वर्षे या दोघांना लाच घेतांना रंगे हात पकडले असून सदरची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस अधीक्षक ला प्र वि पुणे परिक्षेत्र राजेश बनसोडे आणि अपर पोलीस अधीक्षक ला प्र वि पुणे सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस निरीक्षक वीरनाथ माने, पोलीस शिपाई दिनेश माने, पोलीस शिपाई भूषण ठाकुर, चालक पोलीस हवालदार प्रकाश तावरे यांनी केली असून सदर प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.