चाळीसगाव(प्रतिनिधी):-आज कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या प्रकारे डॉक्टर व पोलीस प्रशासन आपले कर्तव्य बजावत आहे त्या प्रकारे नगरपरिषद व नगरपंचायत कर्मचारी अत्यावश्यक सेवा म्हणून आपले कर्तव्य बजावत आहे पाणी पुरवठा,साफसफाई,डेली बाजार, विविध सर्वेक्षण,बाहेरून आलेले नागरिक शोधणे तसेच प्रशासनातर्फे आलेले विविध आदेश काटेकोर अंमलबजावणी चे काम नगरपालिका कर्मचारी यांच्या तर्फे केले जाते अत्यावश्यक सेवेत कार्य करतांना आपल्या कुटुंबाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत असतात
डॉक्टर व पोलीस कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्यात आले आहे तरी नगरपरिषद व नागरपंचयती मधील कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण मिळावे व रोजनदारी कर्मचाऱ्यांना कर्मचारी समाविष्ट प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी चाळीसगांव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे,नगरविकास मंत्री मा एकनाथराव शिंदे व नगरविकास राज्यमंत्री मा प्राजक्तदादा तानपुरे यांना केली आहे.
विजय जाधव,राहुल निकम व सर्व नगरपालिका कर्मचारी यांनी आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या मागणी बद्दल आभार मानले.