पिता पुत्राच्या अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू, गावात पसरली शोककळा,आमदार चव्हाण यांनी केले कुटुंबाचे सांत्वन

0 0
Read Time2 Minute, 17 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक(शेख)

चाळीसगांव(प्रतिनिधी)-शेतकरी पिता पुत्राचा वीज कोसळुन जागीच मृत्यू अतिशय दुर्दैवी अश्या घटनेने चाळीसगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
न्हावे येथील शेतकरी आबा शिवाजी चव्हाण हे आपल्या कुटुंबासह शेतात काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यात आबा चव्हाण यांच्यासह त्यांचा अल्पवयीन मुलगा विकी आबा चव्हाण याचा जागीच मृत्यू झाल्याची अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. घटनेची माहिती प्राप्त होताच तात्काळ घटनास्थळी जाऊन आमदार मंगेश चव्हाण यांनी पाहणी केली व दुःखाचा डोंगर कोसळलेल्या चव्हाण परिवाराचे व न्हावे ग्रामस्थांचे सांत्वन केले. सदर परिवारावर आलेले संकट हे कुठल्याही आर्थिक मदतीने किंवा सांत्वनाने भरून निघणार नाही इतके मोठे आहे मात्र अश्या काळात आपण सर्वांनी या कुटुंबाच्या पाठीशी राहून त्यांना आधार देणे गरजेचे आहे.
सदर परिवाराला तात्काळ शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना तहसीलदार यांना केल्या असून लवकरात लवकर मदत मिळावी म्हणून प्रयत्नशील असणार असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी सांगितले

सर्व चाळीसगावतालुका वासीयांना विनंती आहे की निसर्गचक्र खूप बदलत असून कधी आणि किती मोठा पाऊस पडेल, वादळ येईल याची अनिश्चितता झाली आहे. पुढील ४ दिवस उत्तर महाराष्ट्रात मुसळदार पावसाचा अंदाज असल्याने आपण सर्वानी योग्य ती खबरदारी घ्यावी-आमदार मंगेश चव्हाण

Happy
Happy
0 %
Sad
Sad
100 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.