Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

जनावरांच्या दवाखान्यात डॉक्टर नेहमीच उपलब्ध नसतात? यामुळे पाळीव जनावरांसह मालकांचे हाल

0
0 0
Read Time2 Minute, 27 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय देशमुख

चाळीसगांव(प्रतिनिधी)-तालुक्यातील मोठा गाव म्हणून मेहुनबारे गावाची ओळख असून आजू बाजूला अनेक गाव या गावास जोडली गेली आहेत तसेच शेतीची कामे जोरात सुरू असल्यामुळे व पावसाळ्यात पाळीव प्राण्यांचे आजारी पडण्याचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे त्यात आजून भर म्हणजे लंपी हा आजार आणि अश्यात जनावरांच्या दवाखान्यात रहिवाशी डॉक्टर नसल्याने पाळीव जनावरांसह मालकांचे देखील हाल होत आहेत.
मेहुनबारे जनावरांच्या दवाखान्यात रहिवाशी डॉक्टर नसल्याने प्रभारी डॉक्टरांना कारभार देण्यात आला आहे मात्र प्रभारी डॉक्टरांना दवाखान्यात येण्यासाठी वेळ नसतो? की त्यांच्यावर जबाबदाऱ्या जास्त आहे,डॉक्टर कोणत्या दिवशी उपलब्ध असतील याची काहीच कल्पना नसल्याने नेमकं काय चाललंय कळण्यास मार्ग नाही मात्र यामुळे पाळीव प्राणी मालकांचे व प्राण्यांचे हाल मात्र नक्की होत आहे,जवळपास नेहमीच दवाखान्यात डॉक्टर नसतात त्यामुळे पाळीव जनावरांना उपचारासाठी आणतांना जनावर मालकांची धावपळ तर होतच असते त्यात डॉक्टर नसल्याने आजून जास्त मानसिक त्रास मालकांना सहन करावा लागतो तसेच वेळवर उपचार न मिळाल्याने पाळीव प्राणी दगावण्याची शक्यता असते त्यात लंपी या आजाराने डोके वर काढल्याने प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करत असून या जनावरांच्या दवाखान्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून कायम स्वरूपी रहिवासी डॉक्टर या जनावरांच्या दवाखान्यात उपलब्ध व्हावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
50 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
50 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: