अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक(शेख)
चाळीसगांव(प्रतिनिधी)-भारतीय स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापनदिनानिमित्त चाळीसगाव नगरपालिका आवारात उभारण्यात आलेल्या तालुक्यातील सर्वात उंच अश्या ७५ फूट तिरंगा ध्वजारोहण आज आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी सर्व चाळीसगाव शहर वासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
नवीन प्रशासकीय इमारतीत नगरपरिषद स्थलांतर झाल्यानंतर सर्वप्रथमच याठिकाणी ऐतिहासिक असे ध्वजारोहण आमदार चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले,स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात हे मी माझे भाग्य समजतो. चाळीसगाव वासीयांच्या सेवेसाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू असा विश्वास यानिमित्ताने बोलतांना आमदार चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख,चाळीसगांव उपविभागीय अधिकारी लक्षमीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, नगरपरिषद मुख्याधिकारी प्रशांत ठोबंरे, शहर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. के.पाटील यांच्या सह नगर सेवक नपा कर्मचारी तसेच पत्रकार बांधव व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७५ वा अमृत महोत्सवी वर्धापन दिन निमित्ताने आज सकाळी पोलीस ग्राउंड येथे शासकीय ध्वजारोहण समारंभ उत्साहात पार पडला. सदर प्रसंगी देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणारे स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार मंगेश चव्हाण,मा. प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्यासह तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. |