चाळीसगाव( प्रतिनिधी) : दि ४/१/२०२० रोजी कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाद्वारे पी एच डी हे शिक्षण क्षेत्रातील मानाची पदवी चाळीसगाव हाजी उस्मान महाविद्यालयातील भूगोल चे प्राध्यापक डॉ. हुसेन शेख यांना प्रमुख अतिथी मा श्री सुनील देशमुख (माजी व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख वस्तू उत्पन्न व्यापार सिटी बँक अमेरिका) यांचा हस्ते देण्यात आली.यावेळी कुलगुरू पी पी पाटील हे ही उपस्थित होते. हूसेन शेख हे हाजी उस्मान महाविद्यालयात असून त्यांनी ‘A Geographical analysis of farmar suicide in maharashtra’ या विषयांतर्गत पी एच डी प्राप्त केली.तसेच त्यांनी ५ पुस्तकांचे लेखन देखिल केले आहे.त्यांना मार्गदर्शन आर.व्ही. भोळे सर यांनी केले.शेख सर हे महाराष्ट्र अभ्यास समितीचे सदस्य देखील आहेत. व प्राध्यापक संघटनेचे पदाधिकरी देखील आहेत.त्यांचा या यशस्वी होण्यामागे त्यांचे गुरू,मित्र मंडळी ,कुटुंब व नातेवाईक यांचे सहकार्य लाभले. शाळेचे चेअरमन, व्हाइस चेअरमन व सर्व संचालक मंडळाने कौतुक केले.सर्व समाजातून त्यांचे कौतुक होत आहे.
Read Time1 Minute, 45 Second